एक्स्प्लोर
मतांसाठी काँग्रेसने हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली : अरुण जेटली
समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी विशेष न्यायालयाने स्वामी असीमानंद यांना निर्दोष मुक्त केल्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीका करणे सुरु केले आहे.
नवी दिल्ली : समझोता एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी पंचकूलस्थित एनआयएच्या विशेष न्यायालयाने मागील आठवड्यात स्वामी असीमानंद आणि इतर तीन आरोपींना निर्दोष मुक्त केले. या प्रकरणाचा आधार घेत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. "काँग्रेसने समझोता बॉम्बस्फोट प्रकरणात हिंदूंना जाणीवपूर्वक गोवले. स्वामी असीमानंद यांच्यासारख्या लोकांना या प्रकरणात गोवून काँग्रेसने जाणूनबुजून 'हिंदू दहशतवाद' असा शब्द आणला. याप्रकरणावरुन केवळ मतांसाठी त्यांनी हिंदू दहशतवादाची थिअरी मांडली," असा आरोप अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.
अरुण जेटली म्हणाले की, "काँग्रेसने ही थिअरी मांडण्यासाठी खोट्या पुराव्यांच्या आधारे निरपराध लोकांविरोधात खटले दाखल केले. परंतु आता न्यायालयाने याप्रकरणी त्यांचा फैसला सुनावल्यानंतर कोण खरं आणि कोण खोटं हे सिद्ध झाले आहे. जे लोक हिंदूंना दहशतवादी म्हणत होते, तेच लोक आता हिंदू धर्माप्रती निष्ठा सिद्ध करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत."
जेटली म्हणाले की, "काँग्रेसने हिंदू समाजाला बदनाम करण्याचे खूप प्रयत्न केले आहेत, त्यामुळे समाज आता त्यांना माफ करणार नाही. हिंदू दहशतवाद हे काँग्रेसने रचलेले षडयंत्र आहे. हिंदू दहशतवाद या शब्दाचा वापर करुन त्यांनी समाजाची प्रतिमा खराब करण्याचे काम केले आहे."
दरम्यान, 20 मार्च रोजी एनआयएच्या विशेष न्यायालयाने समझोता बॉम्बस्फोट प्रकरणी फैसला सुनावला. तब्बल 12 वर्षे चाललेल्या या खटल्यातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. त्यामध्ये मुख्य आरोपी स्वामी असीमानंद यांच्यासह कमल चौहान, लोकेश शर्मा आणि राजेंद्र चौधरी या तिघांचा समावेश होता.
18 फेब्रुवारी 2007 रोजी समझोता एक्स्प्रेसच्या डब्यांमध्ये स्फोट घडवून आणले होते, त्यामध्ये 68 प्रवासी मृत्यूमुखी पडले होते
A Jaitley: Congress coined 'Hindu terror'&filed cases based on fake evidence to create this theory but in the end court has to take decision.Perhaps because of this, those who considered Hindus as terrorists are now trying to prove their devotion towards religion. #SamjhautaBlast pic.twitter.com/9vdobNf1mX
— ANI (@ANI) March 29, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement