एक्स्प्लोर
पोलिस ठाण्याच्या उद्घाटनानंतर पहिली तक्रार स्थानिक आमदाराविरोधातच
या नव्या पोलिस स्थानकातील पहिलीवहिली तक्रार स्थानिक आमदार सरदेसाई यांच्या विरोधात सादर करण्यात आली आहे.

पणजी (गोवा) : गोव्यातील फातोर्डा मतदारसंघातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या पोलिस स्थानकाचे उद्घाटन दसऱ्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक आमदार तथा मंत्री विजय सरदेसाई उपस्थित होते. महत्त्वाचे म्हणजे, या नव्या पोलिस स्थानकातील पहिलीवहिली तक्रार स्थानिक आमदार सरदेसाई यांच्या विरोधात सादर करण्यात आली आहे. वेर्णा येथील औद्योगिक वसाहतीमधील खुल्या जागेचे रुपांतर औद्योगिक भूखंडांत केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी काशिनाथ शेट्ये यांना धमकी दिल्याचा दावा करत, स्थानिक आमदार विजय सरदेसाई यांच्याविरोधातच आयरिश रॉड्रिग्स यांनी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीसंदर्भातील दृकश्राव्य पुरावे सादर केल्याचा दावा रॉड्रिग्स यांनी केला.
आणखी वाचा























