Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी जवानांचे वाहन स्फोटाने उडवले, 9 जवान शहीद तर अनेकजण मृत्यूमुखी
Chhattisgarh Naxal Attack : नक्षलविरोधी मोहिमेवरून छावणीकडे परत जात असलेल्या जवानांवर नक्षलवाद्यांनी भ्याड हल्ला केला. भूसुरुंगाचा वापर करून नक्षलवाद्यांनी जवानांच्या गाडीचा स्फोट केला.
Chhattisgarh Naxal Attack : छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांच्या वाहनावर हल्ला केला असून त्यामध्ये 7 जवान शहीद झाले आहेत. तर अनेकजण जखमी झाले आहे. नक्षलवाद्यांनी याठिकाणी अगोदरच भूसुरुंग पेरलं होतं. या भूसुरुंगाच्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच नक्षलवाद्यांनी तत्काळ त्याचा स्फोट केल्याची माहिती आहे.
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त कुत्रु ते बेद्रे मार्गावर करकेलीजवळ नक्षलवाद्यांनी जवानांनी भरलेल्या पिकअप वाहनाचा स्फोट केला आहे. नक्षल ऑपरेशन्सचे एडीजी विवेकानंद सिन्हा यांनी या हल्ल्यात आतापर्यंत 9 जवान शहीद झाल्याची पुष्टी केली आहे. शहिदांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही जवान जखमीही झाले आहेत.
आगोदरच भूसुरुंग पेरलं होतं
पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नक्षलविरोधी मोहिमेवरून छावणीकडे परतत असलेल्या वाहनात 15 हून अधिक जवान होते. सैनिकांना लक्ष्य करण्यासाठी नक्षलवाद्यांनी अगोदरच भूसुरुंग पेरलं होतं. त्या ठिकाणी जवानांचे वाहन येताच त्याचा मोठा स्पोट झाला. यामध्ये 9 जवानांना आपले प्राण गमवावे लागले.
Chhattisgarh | Nine people - eight Dantewada DRG jawans and one driver, lost their lives after their vehicle was blown up by naxals through an IED blast, in Bijapur. They were returning after a joint operation of Dantewada, Narayanpur and Bijapur: IG Bastar pic.twitter.com/hqsDHnr8XT
— ANI (@ANI) January 6, 2025
दंतेवाडा, नारायणपूर आणि विजापूरमधील संयुक्त कारवाईनंतर सैनिक परतत होते. सोमवारी दुपारी 2.15 च्या सुमारास, विजापूरच्या कुत्रु पोलिस स्टेशन हद्दीतील आंबेली गावाजवळ अज्ञात नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोटाने सुरक्षा दलाचे वाहन उडवले.
Chhattisgarh: An IED blast occurred near Ambeli village on Kutru-Bedre road, Bijapur. The blast targeted a joint operation team returning from Dantewada, Narayanpur, and Bijapur. Nine personnel, including 8 DRG soldiers and one driver, were martyred pic.twitter.com/E1rQnPIYnj
— IANS (@ians_india) January 6, 2025
ही बातमी वाचा: