अल्पवयीन नणंद थेट वहिनीच्या प्रेमात पडली, दोघींचा लग्न करण्याचा निर्णय; घरच्यांकडून बेदम मारहाण!
तरुणीची तिच्या गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी मैत्री आहे. तरुणी या महिलेच्या घरी गेली असून आता त्यांना लग्न करायचे आहे. आता या लग्नात महिलेकडील कुटुंबीय अडसर ठरत आहेत.
उन्नाव (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एक अल्पवयीन मुलगी नात्यातील विवाहित महिलेच्या प्रेमात पडल्याने भलताच प्रसंग घडला आहे. दोघी नात्यामध्ये नणंद भावजय असून त्यांची गेल्या पाच महिन्यांपासून मैत्री सुरु आहे. त्यामुळे दोघींनी विवाहाचा निर्णय घेतला आहे. मात्र, महिलेच्या कुटुंबीयांना हा विवाह होऊ द्यायचा नसल्याने महिलेच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण करून विष पाजल्याचा आरोप अल्पवयीन मुलीने केला आहे.
लग्नात महिलेकडील कुटुंबीय अडसर
दुसरीकडे, पीडित कुटुंबाकडून तक्रार आल्यास कारवाई केली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी तरुणीचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. ही घटना बांगरमाऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बेहता मुजावर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीची तिच्या गावात राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी मैत्री आहे. तरुणी या महिलेच्या घरी गेली होती. त्यांना लग्न करायचे आहे. या लग्नात महिलेकडील कुटुंबीय अडसर ठरत असल्याने त्यांनी कडाडून विरोध केला.
Mukesh Chandrakar Murder Case : पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यात 15 खुणा, लिव्हरचे 4 तुकडे, मान, बरगड्या अन् हृदय सुद्धा तुटलेल्या स्थितीत #MukeshChandrakar https://t.co/HAmW9J39dp
— ABP माझा (@abpmajhatv) January 6, 2025
विवाहित तरुणीचे कुटुंबीय या संबंधावर नाराज
मुलीचे म्हणणे आहे की, बांगरमाऊ येथे राहणाऱ्या एका महिलेचे तिच्या गावात सासर आहे. विवाहित महिलेशी पाच महिन्यांपासून मैत्री आहे आणि तिला लग्न करायचे आहे. मात्र विवाहित तरुणीचे कुटुंबीय या संबंधावर नाराज आहेत. तरुणीचे म्हणणे आहे की, ती तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येथे आली होती, तेव्हा विवाहितेच्या कुटुंबीयांनी तिला पकडले, जबरदस्तीने विष पिण्यास भाग पाडले आणि मारहाण केली. विवाहितेला तिच्या पालकांकडून मारहाण केली जात असल्याचे मुलीचे म्हणणे आहे. तिचा पती चांगला नसल्याने आम्ही दोघींनी लग्नाचा निर्णय घेतल्याचे मुलीने म्हटले आहे.
वडील उपचारासाठी रुग्णालयात दाखल
मुलीच्या वडिलांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले आहे. वडिलांचे म्हणणे आहे की, माहिती मिळताच आम्ही येथे आलो आणि मुलीला उपचारासाठी रुग्णालयात आणले. उपचारानंतर मुलीचे कुटुंबीय तिला आपल्यासोबत घरी घेऊन गेले. या प्रकरणी सीओ बांगरमाऊ अरविंद चौरसिया यांनी सांगितले की, ही बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. मुलगी अल्पवयीन असून तिने विष प्राशन केल्याचा आरोप केला आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल. सध्या दोन मुलींमधील प्रेमप्रकरणाचे हे अनोखे प्रकरण लोकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या