Punjab New CM: चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री, राज्यात पहिल्यांदाच दलित नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड
Punjab New CM: पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे.
Punjab Congress Crisis: पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून चरणजीत सिंह चन्नी यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री असतील. हरीश रावत यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली. चन्नी दलित समाजातून येतात. ते कॅप्टन सरकारमध्ये मंत्री होते.
चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत. विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर चरणजीत सिंह चन्नी प्रथमच मीडियासमोर आले. त्यांना प्रसारमाध्यमांकडून प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी राज्यपाल सभागृहातून बाहेर आल्यानंतर बोलू असे सांगितले. ते संध्याकाळी 6.30 वाजता राज्यपालांना भेटणार आहेत.
चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री म्हणून घोषित झाल्यानंतर काँग्रेस नेते सुखजिंदर सिंह रंधावा म्हणाले, की हा हायकमांडचा निर्णय आहे. मी त्याचे स्वागत करतो. चन्नी माझ्या लहान भावासारखे आहेत."
कोण आहे चरणजीत सिंग चन्नी?
चरणजीत सिंह चन्नी अमरिंदर सिंग सरकारमध्ये तंत्रशिक्षण आणि पर्यटन मंत्री होते. ते चमकौर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. ते पंजाब विधानसभेत विरोधी पक्षनेते राहिले आहेत.
काँग्रेसने दिला संदेश
काँग्रेसच्या या निर्णयाला पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांशी जोडून पाहिले जात आहे. राज्यात दलित लोकसंख्या तीस टक्क्यांहून अधिक आहे. त्याचबरोबर काँग्रेसने चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवून पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील मतभेद संपवण्याचा प्रयत्न केला आहे.
अमरिंदर सिंग यांनी शनिवारी राजीनामा दिला
अमरिंदर सिंग यांनी शनिवारी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा दीर्घ राजकीय संघर्षानंतर राजीनामा दिला. आमदारांची बैठक वारंवार बोलवल्याने त्यांना अपमानित वाटले, त्यानंतर त्यांनी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले.