एक्स्प्लोर
नोटाबंदी : चंद्राबाबूंच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री समितीची आज पहिली बैठक
मुंबई : नोटाबंदीनंतर देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी कॅशलेस अर्थव्यवहार हा एक मार्ग आहे. त्याबाबत अधिक विचार करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या समितीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंच्या समितीची बैठक मुंबईत रिजर्व बँकेच्या मुख्यालयात होत आहे.
चंद्राबाबू सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, ओदिशाचे नवीन पटनायक, सिक्कीमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे.
वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांसोबतच निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पगारिया आणि निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांचाही या समितीमध्ये समावेश आहे.
सध्याच्या नोटाटंचाईवर फक्त डिजीटल मार्गानेच तोडगा निघू शकतो, असं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायुडू यांना वाटतं. त्याचा पहिला प्रयत्न म्हणून त्यांनी आंध्रप्रदेशसाठी एपीपर्स हे ई वॉलेट लाँच केलंय. महाराष्ट्र सरकारनेही महावॉलेट नावाचं ई वॉलेट लाँच करण्याची घोषणा केलीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement