(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Unlock Guidelines : आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी, वाचा नव्या मार्गदर्शक सूचना
New Unlock Guidelines : आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी विविध ठिकाणं खोलण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
New Unlock Guidelines : मागील काही आठवडे कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत घट होत आहे. देशातील विविध राज्यांमध्ये रुग्णसंख्या बऱ्यापैकी नियंत्रणांत आल्याने आता केंद्र सरकारने नव्या अनलॉक गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने इतर व्यवहारही सुरळीत व्हावे यासाठी या नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
या नव्या मार्गदर्शक सूचना एका पत्राद्वारे केंद्राकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत आदेश जारी करून, केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी या पत्रात राज्यांना आज (27 फेब्रुवारी) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. सचिवांनी या पत्रात राज्यातील तसंच जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची संख्या पॉझीटिव्हिटी रेट या साऱ्याचा विचार करुन राज्यात सूचना जारी करण्यास सांगितल्या आहेत. गृह मंत्रालयाने जाहीर केलेल्या या सूचनांचा मूळ उद्देश हा देशातील विविध आर्थिक व्यवहार सुरळीत करणं हा आहे.
नव्या मार्गदर्शक सूचना काय?
या पत्रात लिहिल्याप्रमाणे, एकीकडे कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. परिस्थिती सुधारत असल्याने आर्थिक व्यवहारही (Economic Activities) सुरळीत होणं गरजेचं आहे. त्यामुळे विविध गोष्टींवरील निर्बंध शिथिल होणार आहेत. यातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे
- सामाजिक, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक, उत्सव यासह विविध समारंभावरील निर्बंध हटवले जाऊ शकतात.
- शाळा, महाविद्यालयं तसंच विविध कोचिंग क्लासेस अशा शैक्षणिक आस्थापना कोणत्याही निर्बंधाशिवाय सुरु करता येतील.
- रेस्टोरेंट, सिनेमा हॉल आणि व्यायाम शाळा इत्यादी आस्थापना सुरु करता येऊ शकतात.
- लग्नसमारंभ तसंच अत्यंसंस्कार विधी इत्यादींवरील निर्बंधही हटवले जाणार आहेत.
- सार्वजनिक वाहतूकींवरील निर्बंध तसंच एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवासासाठीचे निर्बंधही काढण्यात येणार आहेत.
- सरकारी तसेच खाजगी कार्यालयं कोणत्याही निर्बंधांशिवाय सुरु करता येतील. असंही यामध्ये नमूद करण्यात आलं आहे.
वरील सर्व तरतूदी या त्या-त्या ठिकाणच्या कोरोना परिस्थितीचा अभ्यास करुन सुरु करण्याची महत्त्वपूर्ण सूचना या पत्रामध्ये देण्यात आली आहे.
हे ही वाचा :
- Mumbai Local : लोकल ट्रेन, मॉल्स येथे केवळ लसीकरण पूर्ण झालेल्याच व्यक्तींना प्रवेश देण्याचा निर्णय आता मागे घ्यायला हवा : हायकोर्ट
- महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोना; ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवण्याबाबत पेच
- Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha