![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा
Covid Vaccination : देशात आतापर्यंत नऊ लसींना कोरोना विरूद्ध मान्यता देण्यात आली आहे. सध्या फक्त चार लसींचा वापर केला जात आहे.
![Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा covid vaccination india has 9 weapons to fight corona four are being used 5 are still waiting Covid Vaccination : भारतात Covishieldसह अनेक लसी सध्या वापरात, तर 'या' पाच लसींची भारताला प्रतिक्षा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/22/c5c3afbd4b8ff938dd6d2fd0e1278c26_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Covid Vaccination : देशात आतापर्यंत नऊ लसींना कोरोना विरूद्ध मान्यता देण्यात आली आहे. परंतु, सध्या केवळ चार लसींचा वापर केला जात आहे. या चार लसींपैकी तीन प्रामुख्याने वापरल्या जात आहेत. तर एक लस नुकतीच लोकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरातील कोरोनाच्या स्थितीवर नजर टाकली तर आतापर्यंत पाच लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
'या' चार लसी सध्या वापरल्या जात आहेत
Covishield - कोविशिल्ड सीरम इन्स्टिट्यूटने विकसित केले आहे. आपत्कालीन वापरासाठी मान्यता मिळविणारे कोविशील्ड ही देशातील पहिली लस होती. या लसीचे दोन डोस घेणे गरजेचे होते. दुसरा डोस पहिल्या डोसनंतर 84 दिवसांनी लागू केला जातो.
Covaxin - कोवॅक्सिन भारत बायोटेकद्वारे उत्पादित केली जाते. ही देशातील दुसरी लस आहे जी वापरण्यासाठी मंजूर झाली आहे. या लशीसाठीसुद्धा दोन डोस घेणे गरजेचे आहे. पहिल्या डोसनंतर, दुसरा डोस 28 दिवसांनी घेतला जातो.
Sputnik V - रशियाच्या Sputnik V ला Kovshield नंतर मान्यता देण्यात आली. कोरोनाची तिसरी लस म्हणून याकडे पाहिले जाते. या लसीचे दोन डोस आहेत. या लसीचा वापर देशातही मोठ्या प्रमाणात झाला आहे.
Zydus Cadila - Zycov D लसीचे तीन डोस आहेत. Zycov D ही सुई मुक्त लस आहे. जी जेट इंजेक्टर वापरून दिली जाईल. ही लस सध्या फक्त 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी मंजूर आहे. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांनी, दुसरा डोस आणि तिसरा डोस 56 दिवसांनी घेतला जाईल.
'या' पाच लशींची भारताला प्रतीक्षा
अमेरिकन कंपनीने बनवलेली मॉडर्ना लस उणे 25 अंशांवर ठेवली आहे. या लसीचेही दोन डोस आहेत. पहिल्या लसीनंतर, दुसरी लस 4 आठवड्यांनी दिली जाते. ही लस भारतात अजून वापरण्यात आलेली नाही.
अमेरिकन कंपनीची जॉन्सन अँड जॉन्सन लस ही सिंगल शॉट लस आहे. जी सध्या फक्त भारतात आणीबाणीच्या वापरासाठी मंजूर आहे. या लसीचा पुरवठा अजून सुरू झालेला नाही.
भारतातील पहिली स्वदेशी विकसित कॉर्बोव्हॅक्स लस हैदराबाद येथील बायोलॉजिकल ई कंपनीने बनवली आहे. त्याचे दोन डोस देखील आहेत. या लसीला गेल्या वर्षाच्या अखेरीस मान्यता देण्यात आली होती. परंतु अजून तिचा वापर सुरू झालेला नाही.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोवोवॅक्स बनवत आहे. ही लस 20 डिसेंबर 2021 रोजी मंजूर करण्यात आली होती. पण अजूनही ही लस लोकांना उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.
डॉ. रेड्डीजच्या प्रयोगशाळेने स्पुतनिक लाईट बनवली आहे. ही हैदराबाद आधारित कंपनी आहे जी एकच डोस म्हणून येते. या लसीला या वर्षी 6 फेब्रुवारीला मान्यता मिळाली होती. मात्र, अजूनही या लसीचा वापर सुरू झालेला नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 13 हजार 405 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 235 जणांचा मृत्यू
- टास्क फोर्सचा मोठा दिलासा, Omicron BA.2 मुळे कोरोनाची पुढची लाट येणार नाही!
- Corbevax Vaccine : 12 वर्षांवरील मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा, Corbevax लसीला DCGI ची मान्यता
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)