(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोना; ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवण्याबाबत पेच
95 वर्षीय ब्रिटेनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोना झाल्याचं काल समोर आलं आहे. ही बातमी अशा वेळी समोर आली आहे ज्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे.
Queen Elizabeth Covid Positive : 95 वर्षीय ब्रिटेनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांना कोरोनाची लागण झाल्याचं काल समोर आलं आहे. ही बातमी अशा वेळी समोर आली आहे ज्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोना निर्बंध हटवण्याबाबत चर्चा सुरु आहे. या आठवड्यात ब्रिटिश सरकार कोरोना निर्बंध उठवणार होतं. मात्र आता पंतप्रधान बोरीस जॉन्सन काय निर्णय घेतील याकडे लक्ष लागून आहे. दुसरीकडे ट्वीटरवर covid is not over असा ट्रेंडही सुरु आहे. सध्या ब्रिटेनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. असं असलं तरी ब्रिटनमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर दिसून आला होता. त्यामुळं काय निर्णय घेतला जातो याकडे लक्ष लागून आहे. आजच ब्रिटनमधील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता होती.
The news of Queen Elizabeth II’s Covid diagnosis comes at an awkward time for Prime Minister Boris Johnson, who was expected to announce this week the lifting of the last virus restrictions in England, including the need to isolate after a positive test. https://t.co/pOSF1KI9rc
— The New York Times (@nytimes) February 20, 2022
ब्रिटेनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे काळजीचे कारण नसल्याचे बकिंगहम पॅलेस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय या आपला मोठा मुलगा प्रिन्स चार्ल्स अर्थात प्रिन्स ऑफ वेल्सच्या संपर्कात आल्या होत्या. प्रिन्स चार्ल्स यांना गेल्या गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत.
Queen Elizabeth II has tested positive for Covid-19. pic.twitter.com/GrqZlXHCJD
— Pop Base (@PopBase) February 20, 2022
क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना सौम्य ताप-थंडीची लक्षणं
बकिंगहम पॅलेसनं रविवारी आपल्या निवदेनात म्हटलं की, "महाराणी क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य ताप-थंडीची लक्षणं आहेत. पण काळजी म्हणून पुढील आठवडभर त्यांच्यावर विंडसर इथं उपचार केले जाणार आहेत. या ठिकाणी राणीला वैद्यकीय मदत मिळत राहील. विंडसर येथे राणी योग्य मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करतील."
73 वर्षीय प्रिन्स चार्ल्स यांना गेल्या आठवड्यात दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्यांनी एका कार्यक्रमात उपस्थिती दर्शवण्यास विरोध दर्शवला होता. प्रिन्स चार्ल्स यांच्या संपर्ता राणी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनाही करोनाची लागण झाल्याचे बोलले जात आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये महाराणी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या होत्या. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता.
युरोप आणि ब्रिटेनमध्ये कोरोनाचा विळखा जास्त प्रमाणात
दरम्यान, कोरोना महामारीने जगभरात हाहा:कार माजवला आहे. युरोप आणि ब्रिटेनमध्ये कोरोनाचा विळखा जास्त प्रमाणात आहे. ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे ब्रिटनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. सध्या ब्रिटेनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे, त्यामुळे देशातील निर्बंध हळूहळू कमी केले जात आहेत. पण जगातील तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचे आणखी काही व्हेरियंट येऊ शकतात, त्यामुळे लसीकरणावर भर दिला पाहिजे. तसेच कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.