(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CBSE ने वादग्रस्त उतारा हटवला, विद्यार्थ्यांना आता पैकीच्या पैकी गुण!
Class 10 English exam : दहावीच्या परीक्षेत विचारण्यात आलेला वादग्रस्त परिच्छेद सीबीएसई बोर्डानं मागे घेतला आहे.
Class 10 English exam : दहावीच्या परीक्षेत विचारण्यात आलेला वादग्रस्त परिच्छेद सीबीएसई बोर्डानं मागे घेतला आहे. तसेच त्या परिच्छेदाचे संपुर्ण गुण विद्यार्थांना देण्यात येणार असल्याचं सीबीएसई बोर्डानं आज जाहीर केलं. याबाबत सीबीएसई बोर्डाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. वादग्रस्त परिच्छेदानंतर काँग्रेसने यावरुन लोकसभेत विरोध दर्शवला होता.
शुक्रवारी सीबीएसईच्या (CBSE) दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला. या पेपरमध्ये देण्यात आलेल्या एका परिच्छेदामुळे विद्यार्थी, पालकांसह राजकीय व्यक्तींनी संताप व्यक्त केला होता. शुक्रवारी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसल्यानंर पेपरमध्ये देण्यात आलेला परीच्छेद पाहून धक्काच बसला. या प्रकरणावर कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी याबाबत ट्विटही केले होते. यानंतर अखेर सीबीएसईने तो वादग्रस्त परिच्छेद मागे घेत असल्याची माहिती दिली.
As the passage in one set of question paper in class X English Exam is not in accordance with guidelines of the board with regard to setting of question papers, it has been decided to drop the question and award full marks to the students for this passage . pic.twitter.com/IHfoUJSy2O
— CBSE HQ (@cbseindia29) December 13, 2021
काय होता परिच्छेद ?
“बायकांच्या मक्तेदारीमुळे पालकांचा मुलांवरील अधिकार नष्ट झाला. पुरुषाला त्याच्या मुळ स्थानावरून खाली आणण्यासाठी पत्नी आणि आईने स्वत:वरील बंधने पायदळी तुडवली. पती आधी "स्वतःच्या घराचा मालक" होता. परंतु, पत्नीने त्याला आपल्या आज्ञेखाली आणले. त्याबरोबरच मुलांना आणि नोकरांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यास शिकवले गेले" असे वर्णन या परीच्छेदात करण्यात आले आहे. अनेक विद्यार्थ्यांना हा स्त्रीयांचा अपमान वाटला. या उताऱ्याखाली देण्यात आलेल्या एका बहुपर्यायी प्रश्नात लेखाकची वैशिष्ट्य विचारण्यात आली आहेत. या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक विद्यार्थ्यांनी “पुरुष अराजकतावादी डुक्कर” असे उत्तर लिहिले. CBSE च्या उत्तर पत्रीकेनुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे लेखक “जीवनाकडे हलक्या-मनाच्या दृष्टीकोनातून पाहतो ”. असे आहे. तर इतर पर्यायांमध्ये लेखक "एक असंतुष्ट पती" किंवा "त्याच्या कुटुंबाचे मनापासून कल्याण साधणारा". असा पर्यायांचा समावेश करण्यात आला होता.
संबंधित बातम्या -
दहावीच्या सीबीएसईच्या परीक्षेतील प्रश्नावरून संताप, विद्यार्थ्यांनी लिहिले आर्श्चयकारक उत्तर
'त्यांच्या घरी पोर होईल का नाही हे मी का सांगू?', राज ठाकरेंचा टोला अन् हशा