दहावीच्या सीबीएसईच्या परीक्षेतील प्रश्नावरून संताप, विद्यार्थ्यांनी लिहिले आर्श्चयकारक उत्तर
परीक्षेत देण्यात आलेल्या एका परिच्छेदामुळे विद्यार्थी, पालकांसह राजकीय व्यक्तींनी संताप व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेला बसल्यानंर पेपरमध्ये देण्यात आलेला परीच्छेद पाहून धक्काच बसला.
नवी दिल्ली : शुक्रवारी सीबीएसईच्या (CBSE) दहावीच्या विद्यार्थ्यांचा इंग्रजी परीक्षेचा एक पेपर झाला. या परीक्षेत देण्यात आलेल्या एका परिच्छेदामुळे विद्यार्थी, पालकांसह राजकीय व्यक्तींनी संताप व्यक्त केला आहे. शुक्रवारी विद्यार्थ्यांना परीक्षेला बसल्यानंर पेपरमध्ये देण्यात आलेला परीच्छेद पाहून धक्काच बसला.
“परीक्षेत असा प्रतिगामी आणि अयोग्य परिच्छेद देण्यात आला यावर माझा विश्वास बसत नाही. 2021 मध्ये राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत CBSE बोर्ड हे करू शकते हे खूप निराशाजनक आहे,” असा संताप चेन्नईच्या एका शाळेतील विद्यार्थिनीने व्यक्त केला आहे.
“बायकांच्या मक्तेदारीमुळे पालकांचा मुलांवरील अधिकार नष्ट झाला. पुरुषाला त्याच्या मुळ स्थानावरून खाली आणण्यासाठी पत्नी आणि आईने स्वत:वरील बंधने पायदळी तुडवली. पती आधी "स्वतःच्या घराचा मालक" होता. परंतु, पत्नीने त्याला आपल्या आज्ञेखाली आणले. त्याबरोबरच मुलांना आणि नोकरांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्यास शिकवले गेले" असे वर्णन या परीच्छेदात करण्यात आले आहे.
अनेक विद्यार्थ्यांना हा स्त्रीयांचा अपमान वाटला. या उताऱ्याखाली देण्यात आलेल्या एका बहुपर्यायी प्रश्नात लेखाकची वैशिष्ट्य विचारण्यात आली आहेत. या प्रश्नाचे उत्तर देताना अनेक विद्यार्थ्यांनी “पुरुष अराजकतावादी डुक्कर” असे उत्तर लिहिले. CBSE च्या उत्तर पत्रीकेनुसार या प्रश्नाचे योग्य उत्तर म्हणजे लेखक “जीवनाकडे हलक्या-मनाच्या दृष्टीकोनातून पाहतो ”. असे आहे. तर इतर पर्यायांमध्ये लेखक "एक असंतुष्ट पती" किंवा "त्याच्या कुटुंबाचे मनापासून कल्याण साधणारा". असा पर्यायांचा समावेश करण्यात आला होता.
एका इंग्रजी वृत्तपत्राला सीबीएसईच्या प्रवक्त्याने प्रतिक्रीया देताना सांगितले की, या परिच्छेदाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. "बोर्डाच्या प्रश्नपत्रीकेतील परिच्छेदाबद्दलची तक्रार विषय तज्ञांकडे पाठवली जाईल. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी या प्रकारावर योग्य कारवाई केली जाईल."
इतर महत्वाच्या बातम्या
Trending News : सलमान-कतरिनामुळे व्हायरल झाला चहावाला, जाणून घ्या काय आहे कारण?
महापौर करण्यासाठी एका-एका नगरसेवकाला 35-35 लाख दिले ; विनय कोरे यांची कबुली
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI