एक्स्प्लोर
Advertisement
19 वर्षांच्या मेहनतीला यश, अमोल यादव यांच्या विमानाच्या उड्डाणाचा मार्ग मोकळा
एखाद्या भारतीयाने बनवलेल्या विमानाला 'स्पेशल परमिट टू फ्लाय'चं प्रमाणपत्र मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं अमोल यादव यांनी सांगितलं.
नवी दिल्ली : मराठमोळे वैमानिक अमोल यादव यांची 19 वर्षांची मेहनत आणि संघर्ष अखेर फळाला आला आहे. मेक इन इंडिया अंतर्गत बनवलेलं पहिलं मेड इन इंडिया 6 सीटर विमानाला आज (19 ऑक्टोबर) डीजीसीएकडून प्रमाणपत्र मिळालं आहे. कॅप्टन अमोल यादव यांनी 19 वर्षांच्या मेहनतीने हे विमान तयार केलं आहे. आता ते उड्डाण आणि चाचणीसाठी तयार आहे. एखाद्या भारतीयाने बनवलेल्या विमानाला 'स्पेशल परमिट टू फ्लाय'चं प्रमाणपत्र मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं अमोल यादव यांनी सांगितलं.
हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अमोल यादव आता स्वत: बनवलेल्या विमानाची चाचणी करु शकणार आहेत. यानंतर डीजीसीएच्या नियमानुसार विमानाची चाचणी घ्यावी लागेल आणि त्यानंतर त्याची बाजारात विक्री केली जाईल. "या वर्षाअखेरीस टेस्ट फ्लाय आणि इतर चाचण्यांची सर्व औपचारिकता पूर्ण करुन विमान बाजारात आणेन," असं अमोल यादव यांनी सांगितलं.
या स्पेशल परमिट टू फ्लायनंतर उड्डाणासाठी अमोल यादव यांना 14 दिवसांचा टेस्ट कोर्स करावा लागणार आहे, त्यानंतरच ते उड्डाण करु शकतात. महाराष्ट्र सरकारने धुळ्यात उपलब्ध करुन दिलेल्या एअर स्ट्रिपमध्ये अमोल आपल्या विमानाची चाचणी करतील. मागील 19 वर्षात अमोल यांनी आपली कमाई आणि कुटुंबाच्या मदतीने कोट्यवधी रुपये खर्च करुन हे विमान बनवलं आहे.
कॅप्टन अमोल यादव यांच्या माहितीनुसार, "डीजीसीएची चाचणी आणि सगळी औपचारिकता पूर्ण केल्यानंतर ते राज्य सरकारने दिलेल्या जागेवर 19 सीटर विमान बनवणार आहेत. सध्या या विमानाची किंमत किती असेल याबाबत कोणताच विचार केलेला नाही."
मुंबईतील कांदिवलीमध्ये राहणारे अमोल यादव 2005 पासून कमर्शिअल पायलट म्हणून ते काम करत आहेत. ते पहिल्यांदा जेट एअरवेजमध्ये होते आणि सध्या स्पाईस जेटमध्ये काम करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement