एक्स्प्लोर
बुलेट ट्रेनचं काम 2017 मध्ये सुरु होणार!
मुंबईः मुंबई ते अहमदाबाद या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम 2017 पर्यंत सुरु होणार आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे सदस्य मोहम्मद जमशेद यांनी दिली.
टर्मिनलसाठीची जागा निश्चित करणं आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सध्या सुरु असल्याचं जमशेद यांनी सांगितलं. ते मुंबईत एका परिषदेत बोलत होते.
बुलेट ट्रेन टर्मिनल बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) व्हावं अशी रेल्वेची इच्छा आहे. मात्र राज्य सरकारने त्याऐवजी बांद्रा रिक्लेमेशनची जागा देण्याचा पर्याय दिला आहे. कारण एमएमआरडीएने बीकेसीत आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र उभारण्याचं यापूर्वीच नियोजन केलेलं आहे.
रेल्वे प्रशासन मात्र राज्य सरकारने सुचवलेल्या जागेसाठी उत्सुक नसल्याचं जमशेद यांनी सांगितलं. त्यामुळे टर्मिनलच्या जागेबाबत अंतिम निर्णय निती आयोग आणि पंतप्रधान कार्यालयाकडूनच घेतला जाणार आहे.
काय आहे बुलेट ट्रेन प्रकल्प?
बुलेट ट्रेन 2023 मध्ये धावण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मुंबई ते अहमदाबाद हे 500 किमीचं अंतर बुलेट ट्रेनने केवळ 2 तासात कापणं शक्य होणार आहे. बुलेट ट्रेनचा ताशी वेग 350 किमी प्रति तास एवढा असेल.
या प्रकल्पाची अंदाजे किंमत 97 हजार 636 कोटी रुपये एवढी आहे. जपानकडून या प्रकल्पासाठी कर्ज दिलं जाणार आहे. यामध्ये व्याज, बांधकाम, आयात कर यांचा समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement