एक्स्प्लोर

राजीव गांधी फाऊंडेशनच्या चिनी फंडिंगची चौकशी; कथित गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी गृहमंत्रालयाची समिती

राजीव गांधी फाऊंडेशनवरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल चढवला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गांधी कुटुंबियांवर निशाणा साधत प्रश्न विचारले होते. आता याप्रकरणी गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारत-चीन सीमावादानंतर राजीव गांधी फाउंडेशनला 2005-06 दरम्यान चीनकडून झालेल्या फंडिंग बाबत भाजपने प्रश्न उपस्थित केले होते, आता याप्रकरणी गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी गृहमंत्रालयाची समिती नेमण्यात आली आहे. ही समिती गांधी कुटुंबियांचा संबंधित राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या सर्व संस्थांच्या कारभाराची चौकशी करणार आहे. ईडीचे स्पेशल डायरेक्टर या समितीचे प्रमुख असणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट या तीनही संस्था थेट गांधी कुटुंबाशी निगडीत आहेत. राजीव गांधी फाऊंडेशन, राजीव गाधी चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्थांच्या अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी काम पाहतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम, राहुल गांधी हे या फाऊंडेशनचे सदस्य आहेत. शिवाय इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टचं कामही सोनिया गांधीच पाहतात. या तीनही संस्थांमध्ये मनी लॉंड्रिंग झालंय का? किंवा इन्कम टॅक्सचे घोटाळे झालेत का? विदेशी मदतीच्या नियमाचं उल्लंघन झालंय का? हे तपासून पाहिलं जाणार आहे.

2005-06मध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी या सत्ताधारी पक्षाकडून राजीव गांधी फाऊंडेशनला 30 लाख अमेरिकी डॉलर्सचा निधी दिल्याचा आरोप आहे. चीन सीमेवरच्या घटनेनंतर राहुल गांधी जेव्हा आक्रमकपणे सरकारला प्रश्न विचारु लागले, त्यानंतर भाजपनं हा मुद्दा उपस्थित केला होता. काँग्रेस आणि चीनचे गुप्त संबंध असल्याचा आरोपही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला होता. शिवाय याच मदतीच्या बदल्यात भारत आणि चीनमधल्या व्यापारी संंबंधात अनुकूलता दिली गेली, असाही आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, राजीव गांधी फाऊंडेशनवरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल चढवला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गांधी कुटुंबियांवर निशाणा साधला. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले? असा सवाल विचारला. तसेच आणखी 10 प्रश्न जेपी नड्डा यांनी विचारले होते.

कोरोनामुळे किंवा चीनमधील परिस्थितीमुळे मूळ प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करु नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देश सुरक्षित आहे. देशातील जनतेला हे जाणून घ्यायचं आहे की, सत्तेत असताना कॉंग्रेसने काय केलं? देशातील नागरिकांचा कसा विश्वासघात केला? हे सोनिया गांधी यांनी सांगावं, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.

पाहा व्हिडीओ : भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा सोनिया गांधींवर निशाणा; राजीव गांधी फाऊंडेशनबाबत विचारले 'हे' प्रश्न

राजीव गांधी फाऊंडेशन आणि चीनचा काय संबंध? फाऊंडेशनचा कारभार आरटीआय अंतर्गत का नाही? पंतप्रधान फंडातून राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले होते? मेहूल चोकसीला कर्ज का दिलं? राजीव गांधी सरकाराला चीनकडून पैसे का मिळाले? चीनसोबतचे व्यवहार का वाढवले? असे अनेक प्रश्न जे. पी. नड्डा यांनी उपस्थित केला होता.

जेपी नड्डा यांनी विचारलेले 10 प्रश्न :

1. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून पैसे का मिळाले? 2. कॉंग्रेस सरकारमध्ये चीनबरोबर व्यापार का वाढला? 3. लक्झमबर्गकडून राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का मिळाले? 4. पंतप्रधानांची राष्ट्रीय सहाय्यता निधी जनतेची जो जनतेला सेवा आणि मदतीसाठी आहे, यातून राजीव गांधी फाउंडेशनला 2005-08 पर्यंत पैसे का मिळाले? देशातील जनतेला याचं उत्तर जाणून घ्यायचे आहे. देशातील जनतेने त्यात कष्टाने पैसे दिलेत. 5. यूपीएच्या काळात राजीव गांधी फाउंडेशनला पैसे देण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्रालये, सेल, गेल, एसबीआय यावर दबाव आणला गेला. एका खासगी संस्थेकडे पैसे पाठवण्याचे काम का केले गेले? यामागील कारण काय होते? 6. या फाउंडेशनमध्ये कॉर्पोरेटकडून मोठा निधी घेण्यात आला. मोठ्या निधीच्या बदल्यात कंत्राटं देण्यात आली. असं का झालं? 7. पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचे ऑडिटर कोण आहेत? ठाकूर वैद्यनाथन आणि अय्यर कंपनी ऑडिटर होती. रामेश्वर ठाकूर हे त्याचे संस्थापक होते. ते राज्यसभेचे खासदार होते आणि चार 8. राज्यांचे राज्यपाल होते. अनेक वर्ष ते ऑडिटर होते. अशा लोकांना अशा प्रकारचे कंत्राट देऊन सरकार काय करण्याचा प्रयत्न करत होतं? 9. राजीव गांधी फाऊंडेशनला जवाहर भवनच्या नावावर कोट्यवधींची जमीन लीजवर कशी दिली गेली? राजीव गांधी फाऊंडेशनची खाती कॅग ऑडिटला का नकार देत आहेत? त्यांचे ऑडिट का झाले नाही? यासाठी आरटीआय का लागू झाला नाही? 10. या फाऊंडेशनने पैसे तर घेतल पण देण्याचंही काम केलं. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला ही देणगी कशी दिली गेली हे जाणून घ्यायचे आहे. 11. मेहुल चोकसीने राजीव गांधी फाउंडेशनकडून पैसे का घेतले? मेहुल चोकसी याचा काय संबंध आहे? मेहुल चोकसीला तुम्ही कर्ज का दिले? मेहुल चोकसीचा राजीव गांधी फाऊंडेशनशी काय संबंध आहे, हे देशाला जाणून घ्यायचे आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा सोनिया गांधींवर निशाणा; राजीव गांधी फाऊंडेशनबाबत विचारले 'हे' प्रश्न

भाजपच्या आरोपांवर काँग्रेसचा पलटवार; चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का? : बाळासाहेब थोरात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Donald Trump : तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
तर संविधान बदलावं लागेल! डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा निवडून येताच थेट देशाच्या संविधानालाच हात घातला
Purva Walse Patil : शरद पवारांनी आंबेगावच्या सभेत दिलीप वळसे पाटील यांना गद्दार म्हटलं, पूर्वा वळसे पाटील पाण्याचा मुद्दा काढत म्हणाल्या.. होय...
शरद पवार यांच्याकडून दिलीप वळसे पाटील यांच्यावर आंबेगावत गद्दारीचा शिक्का मारला, पूर्वा वळसे पाटील म्हणाल्या...
Embed widget