भाजप अध्यक्ष जेपी नड्डांचा सोनिया गांधींवर निशाणा; राजीव गांधी फाऊंडेशनबाबत विचारले 'हे' प्रश्न
देशातील नागरिकांचा कसा विश्वासघात केला? राजीव गांधी फाऊंडेशन आणि चीनचा काय संबंध? हे सोनिया गांधी यांनी सांगावं, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.
नवी दिल्ली : राजीव गांधी फाऊंडेशनवरुन भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी गांधी कुटुंबियांवर निशाणा साधला. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले? असा सवाल विचारला. तसेच आणखी 10 प्रश्न जेपी नड्डा यांनी विचारले आहेत.
कोरोनामुळे किंवा चीनमधील परिस्थितीमुळे मूळ प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करु नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची आणि देशांच्या सीमांचे रक्षण करण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देश सुरक्षित आहे. देशातील जनतेला हे जाणून घ्यायचं आहे की सत्तेत असताना कॉंग्रेसने काय केलं? देशातील नागरिकांचा कसा विश्वासघात केला? हे सोनिया गांधी यांनी सांगावं, असं जेपी नड्डा यांनी म्हटलं.
राजीव गांधी फाऊंडेशन आणि चीनचा काय संबंध? फाऊंडेशनचा कारभार आरटीआय अंतर्गत का नाही? पंतप्रधान फंडातून राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले होते? मेहूल चोकसीला कर्ज का दिलं? राजीव गांधी सरकाराला चीनकडून पैसे का मिळाले? चीनसोबतचे व्यवहार का वाढवले? असे अनेक प्रश्न जे पी नड्डा यांनी उपस्थित केला.
जेपी नड्डा यांनी विचारलेले 10 प्रश्न
- राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून पैसे का मिळाले?
- कॉंग्रेस सरकारमध्ये चीनबरोबर व्यापार का वाढला?
- लक्झमबर्गकडून राजीव गांधी फाउंडेशनला पैसे का मिळाले?
- पंतप्रधानांची राष्ट्रीय सहाय्यता निधी जनतेची जो जनतेला सेवा आणि मदतीसाठी आहे, यातून राजीव गांधी फाउंडेशनला 2005-08 पर्यंत पैसे का मिळाले? देशातील जनतेला याचं उत्तर जाणून घ्यायचे आहे. देशातील जनतेने त्यात कष्टाने पैसे दिलेत.
- यूपीएच्या काळात राजीव गांधी फाउंडेशनला पैसे देण्यासाठी अनेक केंद्रीय मंत्रालये, सेल, गेल, एसबीआय यावर दबाव आणला गेला. एका खासगी संस्थेकडे पैसे पाठवण्याचे काम का केले गेले? यामागील कारण काय होते?
- या फाउंडेशनमध्ये कॉर्पोरेटकडून मोठा निधी घेण्यात आला. मोठ्या निधीच्या बदल्यात कंत्राटं देण्यात आली. असं का झालं?
- पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीचे ऑडिटर कोण आहेत? ठाकूर वैद्यनाथन आणि अय्यर कंपनी ऑडिटर होती. रामेश्वर ठाकूर हे त्याचे संस्थापक होते. ते राज्यसभेचे खासदार होते आणि चार राज्यांचे राज्यपाल होते. अनेक वर्ष ते ऑडिटर होते. अशा लोकांना अशा प्रकारचे कंत्राट देऊन सरकार काय करण्याचा प्रयत्न करत होतं?
- राजीव गांधी फाऊंडेशनला जवाहर भवनच्या नावावर कोट्यवधींची जमीन लीजवर कशी दिली गेली? राजीव गांधी फाऊंडेशनची खाती कॅग ऑडिटला का नकार देत आहेत? त्यांचे ऑडिट का झाले नाही? यासाठी आरटीआय का लागू झाला नाही?
- या फाऊंडेशनने पैसे तर घेतल पण देण्याचंही काम केलं. राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्टला ही देणगी कशी दिली गेली हे जाणून घ्यायचे आहे.
- मेहुल चोकसीने राजीव गांधी फाउंडेशनकडून पैसे का घेतले? मेहुल चोकसी याचा काय संबंध आहे? मेहुल चोकसीला तुम्ही कर्ज का दिले? मेहुल चोकसीचा राजीव गांधी फाऊंडेशनशी काय संबंध आहे, हे देशाला जाणून घ्यायचे आहे.