एक्स्प्लोर
Advertisement
उत्तर प्रदेशसाठी भाजपचं घोषणापत्र, राम मंदिराच्या मुद्द्याला पुन्हा हात
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपलं निवडणूक घोषणापत्र पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते प्रकाशित केलं. या घोषणापत्रात भाजपने उत्तर प्रदेशच्या विकासाच्या नऊ मुद्द्यांवर भर दिला आहे. भाजपने या निवडणुकीसाठी महिला सुरक्षेपासून ते तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे आणि शेतकऱ्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर दिला आहे. विशेष म्हणजे, पक्षाने या निवडणुकीसाठी हिंदुत्वाचा राग आळवला असून, राम मंदिरासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं आहे.
राम मंदिर लवकरच बांधणार
राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलना भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी, जर उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यास, घटनेच्या चौकटीत राहून राम मंदिर लवकरच बांधू, असं सांगितलं आहे.
शेतकऱ्यांच्या कर्जावरील व्याज माफ
याशिवाय भाजपने शेतकऱ्यांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. घोषणापत्रानुसार, भाजपचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज आकारले जाणार नाही, शेतमजुरांचा दोन लाखापर्यंतचा विमा उतरवणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याबाहेरच ऊसाचे बिल तत्काळ चेकने दिले जाईल, असं सांगितलं आहे.
याशिवाय भाजपने इतरही काही महत्त्वाच्या घोषणा या घोषणापत्राद्वारे केल्या आहेत
- सहा शहरांमध्ये हॅलिकॉप्टर सेवा सुरु करणार
- उत्तर प्रदेशमध्ये 25 नवीन मेडिकल कॉलेज उभारणार
- महिला सुरक्षेसाठी टास्क फोर्स बनवणार
- महिलांसाठी 100 फास्ट ट्रॅक कोर्ट बनवणार
- एफआयआर दाखल करतेवेळी भेदभाव केला जाणार नाही.
- कानपूर आणि गोरखपूरमध्ये मेट्रो प्रकल्प उभारणार
- नोएडा आणि लखनऊ मेट्रोचा विस्तार करणार
- पाच वर्षात प्रत्येक घरात 24 तास वीज उपलब्ध करुन देणार
- सर्व घरांमध्ये एलपीजी कनेक्शन देणार
- गरिबांसाठी 100 युनिट वीज 3 रुपये प्रति युनिट दराने देणार
- कॉलेजमध्ये फ्री wifi देणार
- मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत
- मजुरांचा 2 लाखापर्यंतचा मोफत वीमा उतरवणार
- प्रत्येक गावांना बस सेवा उपलब्ध करुन देऊन, तहसील केंद्राशी संलग्न करणार
- प्रत्येक तरुणाच्या हातात रोजगार
- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणार
- याशिवाय एक वर्षापर्यंत 1GB फ्री इंटरनेट दिले जाईल
- अवैध कत्तलखाने बंद करणार
- गुन्हेगारांवर तत्काळ कारवाई होईल.
- 45 दिवसात गुन्हेगारांना अटक करुन तुरुंगात पाठवणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
Advertisement