एक्स्प्लोर
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज, प्रचाराला सुरुवात
येणाऱ्या काळात भाजपचे कार्यकर्ते 10 कोटी जनतेपर्यंत पोहोचून संवाद साधणार आहेत. 10 कोटी जनतेच्या सुचनांच्या आधारे संकल्पपत्र तयार करण्यात येणार आहे, असं शाह म्हणाले.
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या ऑफिशियल कॅम्पेनला आजपासून सुरुवात केली आहे. निवडणुकांसाठी जाहीरनामा तयार करण्याच्या कामाला भाजपनं सुरुवात केली. पुढच्या महिनाभरात देशभरातल्या विविध घटकांशी संवाद साधून हा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. या जाहीरनाम्याला भाजपने संकल्पपत्र असं नाव दिलं आहे.
दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शाह आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत कार्यक्रम भाजपकडून आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात पुढील एक महिन्यात संकल्पपत्र तयार करण्यासाठी कोणकोणत्या बाबी विचारात घेण्यात येणार आहेत, याबाबत माहिती देण्यात आली. 'भारत के मन की बात, मोदी के साथ' ह्या अभियानाखाली पुढील एक महिन्यात जनतेपर्यंत पोहोचण्याचं भाजपाचं मानस असल्याचं ते म्हणाले.
भाजप लोकशाही मजबूत करण्यासाठी एक वेगळा प्रयोग करणार असल्याचं भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितलं. येणाऱ्या काळात भाजपचे कार्यकर्ते 10 कोटी जनतेपर्यंत पोहोचून संवाद साधणार आहेत. 10 कोटी जनतेच्या सुचनांच्या आधारे संकल्पपत्र तयार करण्यात येणार आहे, असं शाह म्हणाले.
संकल्पपत्र तयार करण्यासाठी 300 रथ, 7700 मतपेट्या देशभरात फिरवले जाणार आहे. प्रत्येक राज्यात 20 लोकांची टीम बनवण्यात येईल. जनतेकडून येणाऱ्या सुचनांची 12 विभागात विभागणी केली जाईल. या संकल्पपत्राच्या आधारावर आगामी निवडणुकीचा जाहीरनामा तयार केला जाईल. हा प्रयोग लोकशाही मजबूत करण्यासाठी केला जात असल्याची माहिती अमित शाह यांनी दिली.
यावेळी अमित शाहांनी विरोधी पक्षांवर टीका केली. ते म्हणाले भारतीय जनता पक्षांमध्ये लोकशाही आहे. जी इतर पक्षात नाही. ज्या राजकीय पक्षामध्ये लोकशाही असते तोच पक्ष देशाच्या लोकशाहीला मजबूत करत असतो, असं अमित शाह म्हणाले.
लोकसहभागामुळेच लोकशाही मजबूत होत असते. देशात पहिल्यांदाच कोणता पक्ष संकल्पपत्र बनवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात जनसंपर्क करत आहे, असं गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
करमणूक
Advertisement