एक्स्प्लोर
Advertisement
मणिपूरमध्ये काँग्रेस नंबर वन, मात्र भाजपचा सत्तास्थापनेचा दावा
इम्फाळ : गोव्याप्रमाणे मणिपूरमध्येही काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला तरी भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला. नॅशनल पीपल्स पार्टी आणि लोक जनशक्ती पक्षाच्या पाठिंब्याच्या जोरावार भाजपनं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मणिपूरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला भाजपने कडवी झुंज दिली.
31 आमदारांचं समर्थन असलेलं पत्र भाजप सरचिटणीस राम माधव यांनी मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेप्तुल्ला यांच्याकडे सादर केलं आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसला 26 तर भाजपला 21 जागांवर विजय मिळवता आला आहे. 60 जागा असलेल्या मणिपूर विधानसभेत 31 ही मॅजिक फिगर आहे.
नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) आणि लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) हे दोन्ही एनडीएचे घटकपक्ष आहेत. एनपीपीला मणिपूरमध्ये चार, तर एलजेपीला एक जागा मिळाली आहे. त्यामुळे भाजपचं एकूण संख्याबळ 26 वर गेलं आहे.
एनडीएचा घटकपक्ष असलेल्या नागा पीपल्स फ्रंटसोबत समझोता करुन चार जागा मिळतील. तर आणखी एका आमदाराला सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा करता येईल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
मणिपूरमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा?
भाजप – 21
काँग्रेस – 26
नागा पीपल फ्रंट – 4
नॅशनल पीपल्स पार्टी – 4
तृणमूल काँग्रेस -1
अपक्ष – 1
लोकजनशक्ती पार्टी – 1
इरोम शर्मिला यांचा पराभव
मणिपूरची आयर्न लेडी अशी ख्याती असलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या इरोम शर्मिला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र शर्मिला यांना पराभवाचा जबर धक्का बसलेला आहे. मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग यांनी इरोम शर्मिलांना पराभवाची धूळ चारली. पिपल्स रिसर्जन्स अँड जस्टिस अलायन्स (प्रजा) च्या प्रमुख असलेल्या इरोम चानू शर्मिला मणिपूरमधील थोबल मतदारसंघातून निवडणूक लढवत होत्या. विशेष म्हणजे शर्मिला यांना अवघी 90 मतं मिळाली आहेत. शर्मिला यांनी मुख्यमंत्रिपद भूषवण्याची इच्छाही काही महिन्यांपूर्वी बोलून दाखवली होती. या पराभवानंतर इरोम शर्मिला यांनी यापुढे कधीही निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा केली.संबंधित बातम्या :
चार राज्यात भाजपचं सरकार, उद्या मुख्यमंत्री ठरवू : अमित शाह
मणिपूरची 'आयर्न लेडी' इरोम शर्मिला यांचा दारुण पराभव
पाच राज्यातील 2012 च्या निवडणुकांचं चित्र
पाच राज्यात सर्वाधिक मताधिक्य कुणाला?
ईव्हीएमशी छेडछाड केली जाऊ शकते का?
125 कोटी भारतीयांची ताकद असलेला नवभारत निर्माण होत आहे : मोदी
भाजपने 2019 ची दावेदारी मजबूत केली : आंतरराष्ट्रीय मीडिया
निवडणुका म्हणजे लोकशिक्षणाचं महापर्व : मोदी
लता मंगेशकर-आशा भोसलेंकडून भाजपचं अभिनंदन
5 पैकी 2 मुख्यमंत्री हरले, गोवा आणि उत्तराखंडच्या CM चा पराभव
UP Assembly Election Result 2017: उत्तर प्रदेशचा निकाल
Punjab Assembly Election Result 2017: पंजाबचा निकाल
Uttarakhand Assembly Election Result 2017 : उत्तराखंडचा निकाल
Manipur Assembly Election Result 2017: मणिपूरचा निकाल लाईव्ह
Assembly Election Result 2017 : पाच राज्यांत कोणाची सत्ता?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement