BJP Foundation day: भाजपचा आज स्थापना दिवस, पंतप्रधान करणार पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित
भाजप (BJP) आज आपला 41 वा स्थापना दिवस (Foundation day) साजरा करत आहे. त्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
नवी दिल्ली : देशातला सध्याचा सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेला भाजप आज आपला 41 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि इतर महत्वाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपच्या स्थापना दिवसानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दिल्लीच्या भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्नशील: अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने पक्षाच्या कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात म्हटलं आहे की, "आपल्या परिश्रमातून भाजपला एका विशाल वटवृक्षात रुपांतर करणाऱ्या सर्व महापुरुषांना माझा प्रणाम. राष्ट्रवादी विचारधारा, अंत्योदय सिद्धांत आणि मोदीजींच्या नेतृत्वात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी भाजप नेहमी प्रयत्नशील राहिल."
सभी कार्यकर्ताओं को भाजपा के स्थापना दिवस की शुभकामनाएं।
— Amit Shah (@AmitShah) April 6, 2021
अपने खून पसीने से सींचकर भाजपा को विशाल वटवृक्ष बनाने वाले सभी महापुरुषों को नमन करता हूँ।
राष्ट्रवादी विचारधारा, अंत्योदय के सिद्धांत व मोदी जी के नेतृत्व में देश को आत्मनिर्भर बनाने के लिए भाजपा निरंतर प्रयासरत है। pic.twitter.com/UIyU8NfSt2
भाजप हा परिवार: जेपी नड्डा
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही या प्रसंगी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, "कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आणि संघटन कौशल्याने पक्षाचा आतापर्यंतचा प्रवास शक्य झाला आहे. अत्योदयाला या आपल्या मूलमंत्राच्या आधारे राष्ट्रसेवा करणारे कार्यकर्ते हेच पक्षाचा पाया आहेत."
भारतीय जनता पार्टी के स्थापना दिवस के अवसर पर मैं संगठन के उन सभी महापुरुषों को नमन करता हूँ जिन्होंने अपना सर्वस्व अर्पण कर पार्टी को इस वैभव तक पहुँचाया है। भाजपा एक ऐसा संगठन है जिसके सदस्यों के लिए पार्टी ही परिवार है। #SthapnaDiwas pic.twitter.com/YDbzkF88sj
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) April 6, 2021
महत्वाच्या बातम्या :
- गृहमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख तातडीने दिल्लीला, अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत तासभर खलबतं!
- Vladimir Putin | ब्लादिमिर पुतिन 2036 पर्यंत रशियाच्या सत्तेत कायम, स्वत:च केली तशी तरतूद
- Pandharpur By-election : पंढरपुरात रंगू लागले चेक मेटचे राजकारण; कल्याण काळे यांचे महत्व वाढले