Bhupendra Patel Gujarat CM : भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा CM पदाची जबाबदारी
Bhupendra Patel Take CM Oath : भूपेंद्र पटेल दुसऱ्यांदा गुजरातच्या (Gujrat) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या सोहळ्याला पंतप्रधानांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांचीही उपस्थिती होती.
Gujarat CM Bhupendra Patel Oath : गुजरातचे नवे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) दुसऱ्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. गुजरात विधानसभा (Gujrat Election) निवडणुकीत भाजपनं (Gujrat BJP) विजय मिळवला. भाजपला 156 जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि पुन्हा एकदा सत्ता काबीज केली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा (J.P. Nadda) यांच्यासह देशभरातील महत्वाचे नेते उपस्थित होते. तसेच महाराष्ट्राचे (Maharashtra) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हेही या सोहळ्याला उपस्थित होते.
गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय
भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujarat Assembly Election) ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडे आमदार कनू देसाई यांनी भूपेंद्र पटेल यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानंतर भाजपच्या बैठकीत गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी एकमताने भूपेंद्र पटेल यांची निवड करण्यात आली.
BJP's Bhupendra Patel takes oath as the Chief Minister of Gujarat for the second consecutive time. pic.twitter.com/TcWIq5HcYc
— ANI (@ANI) December 12, 2022
गुजरात निवडणुकीत भाजपनं इतिहास रचला
भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी गुजरातचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भूपेंद्र पटेल यांच्यासह 20 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील शपथ घेतली. भाजपने यंदाच्या विधानसबा निवडणुकीत 156 जागांवर विजय मिळवत नवा इतिहास रचला. यासह भाजपनं 149 जागांवर विजय मिळण्याचा विक्रम मोडला.
Congratulations to Shri Bhupendrabhai Patel on taking oath as CM of Gujarat. I would like to also congratulate all those who took oath as Ministers. This is an energetic team which will take Gujarat to even newer heights of progress. @Bhupendrapbjp pic.twitter.com/olOkELJCpA
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2022
पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शपथ घेतल्यावर भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांचं अभिनंदन केलं. त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून ट्वीट करत म्हटलं आहे की, 'गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याबद्दल भूपेंद्र भाई पटेल यांना खूप खूप शुभेच्छा. मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. गुजरातचं नवे मंत्रिमंडळ एक ऊर्जावान टीम आहे. हे नवं मंत्रिमंडळ गुजरातला एका नव्या उंचीवर पोहोचवेल.'