एक्स्प्लोर

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींना कितपत फायदा? सर्वेक्षणातून धक्कादायक आकडेवारी समोर

Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या भारत जोडो यात्रा खरंच यशस्वी ठरली का? भारत जोडो यात्रेचा राहुल गांधींना कितपत फायदा? सर्वेक्षणातून समोर आलाय जनतेचा कौल.

Lok Sabha Election 2024: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections Results 2023) काँग्रेसनं (Congress) एकहाती विजय मिळवला आणि भाजपला (BJP) चारी मुंड्या चित केलं. कर्नाटकात (Karnataka) भाजपचा दारुण पराभव झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) विरोधी पक्षांच्या बैठकांच्या फेऱ्या सुरू आहेत. भाजपविरोधात विरोधक एकवटले असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी 2024 लोकसभा निवडणुकीसाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते राहुल गांधींची लोकप्रियता वाढत असल्याचं दिसून येत आहे. असंच एक सर्वेक्षण राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लोकप्रियतेवर करण्यात आलं. सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, 'भारत जोडो यात्रे'नंतर (Bharat Jodo Yatra) त्यांची लोकप्रियता वाढली आहे. त्याचबरोबर या सर्वेक्षणात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या 9 वर्षांच्या कामगिरीबाबतही चर्चा करण्यात आली आहे.

NDTV साठी लोकनिती (CSDS) नं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सर्वेक्षण केलं आहे. सर्वेक्षणात राहुल गांधींबाबत आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे. भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची लोकप्रियता 15 टक्क्यांनी वाढली असली तरी पीएम मोदींची लोकप्रियता तशीच आहे. या सर्वेक्षणात 19 राज्यांतील 7 हजारांहून अधिक लोकांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्वेक्षणात राहुल गांधींबद्दल काय?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबत सर्वेक्षणात म्हटलंय की,  26 टक्के लोकांची सुरुवातीपासूनच राहुल गांधींना पसंती आहे, तर 15 टक्के लोकांचं मत आहे की, भारत जोडो यात्रेनंतर ते त्यांना अधिक पसंत करू लागले आहेत. यासोबतच विरोधी पक्षनेत्या ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल हे दोन्ही नेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना चांगली टक्कर देऊ शकतात, असा 34 टक्के लोकांचा विश्वास आहे. तर, 16 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, त्यांचा राहुल गांधींवर विश्वास नाही आणि 27 टक्के लोक तटस्थ आहेत.

विरोधी पक्षातील इतर नेत्यांबाबत काय खुलासा?

याशिवाय विरोधी पक्षांच्या नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर, सध्याच्या परिस्थितीत पंतप्रधान मोदींशी स्पर्धा करणाऱ्यांमध्ये अरविंद केजरीवाल यांना 11 टक्के आणि ममता बॅनर्जी यांना केवळ 4 टक्के मतं मिळाली आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना 5 टक्के लोकांनी मत दिलं आहे.  

नरेंद्र मोदींबद्दल सर्वेक्षणात काय खुलासा? 

सर्वेक्षणात 40 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या कामांना पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारला नुकतीच 9 वर्ष पूर्ण झाली आहेत. यापैकी 25 टक्के लोकांनी त्यांना पंतप्रधानांच्या वक्तृत्व शैलीमुळे ते आवडतात, असं म्हटलं आहे. तर 20 टक्के लोकांनी त्यांच्या विकासकामांसाठी ते आवडत असल्याचं म्हटलं आहे. तसेच, 13 टक्के लोकांनी देशाच्या विकासाबाबत त्यांनी घेतलेल्या मेहनतीबद्दल पंतप्रधानांचं कौतुक केलं आहे. सर्वेक्षणात 11 टक्के लोकांनी पंतप्रधान मोदींच्या धोरणांना पसंती दिली आहे. 

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांना विचारण्यात आलं होतं की, आज लोकसभा निवडणूक झाली तर पंतप्रधानपदी कोणाला पाहायला आवडेल? या प्रश्नाचं उत्तर देताना 43 टक्के लोकांनी नरेंद्र मोदींचं नाव घेतलं आहे, तर 27 टक्के लोकांनी राहुल गांधींना पंतप्रधान म्हणून पसंती दिली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Lok Sabha Election: आज निवडणुका झाल्या तर कोण होणार पंतप्रधान अन् कोणाचं सरकार? मोदी, राहुल गांधींबाबत सर्वेक्षणात खुलासा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget