एक्स्प्लोर
Advertisement
जुन्या 500, 1000 च्या नोटांपासून काय बनवलं जातंय?
राज्य सरकारच्या विविध विभाग आणि एजन्सीमध्ये या स्टेशनरी सामानाचा वापर होत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
चेन्नई : तामिळनाडूची राजधानी चेन्नईच्या एका तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले कैदी नोटाबंदीनंतर चलनातून बाहेर झालेल्या जुन्या 500 आणि 1000 च्या नोटांचा चांगल्या पद्धतीने वापर करत असल्याचं दिसत आहे. छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कटिंग झालेल्या या नोटांचं स्टेशनरीच्या सामानात रुपांतर होत आहे.
चेन्नईच्या पुजहल मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या प्रामुख्याने 25-30 प्रशिक्षित कैद्यांची एक तुकडी या नोटांपासून फाईल पॅड बनवत आहेत.
राज्य सरकारच्या विविध विभाग आणि एजन्सीमध्ये या स्टेशनरी सामानाचा वापर होत असल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
तामिळनाडू कारागृह विभागाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक ए मुरगेसन यांच्या माहितीनुसार, "भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीनंतर चलनातून बाद झालेल्या 70 टन नोटांचे तुकडे देण्याची तयारी दर्शवली होती."
पुजहल जेलला आतापर्यंत यापैकी 9 टन नोटा मिळाल्या आहेत, ज्याचा योग्यपद्धतीने वापर केला जात आहे. फाईल पॅड बनवण्यासाठी 1.5 टन बंद झालेल्या नोटांचा वापर करण्यात आला आहे.
शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना एक महिन्यात 25 दिवस फाईल पॅड बनवण्याचं काम दिलं जातं. इथे 8 तासांच्या कामाचा मोबदला म्हणून 160 रुपयांपासून 200 रुपये मजुरी दिली जाते. कैद्यांना दिली जाणारी मजुरी त्यांच्या कौशल्यावर अवलंबून असते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement