एक्स्प्लोर
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या पूनम यादववर प्राणघातक हल्ला
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या वेटलिफ्टर पूनम यादवसह तिच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे.
वाराणसी : राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या वेटलिफ्टर पूनम यादवसह तिच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगितलं जात आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्यानंतर पूनम यादव वाराणसीला परतली. तेव्हा ती तिच्या आत्याच्या घरी आशीर्वाद घेण्यासाठी गेली. मात्र, यावेळी एका जुन्या वादावरुन तिच्या आत्यासह गावातल्या लोकांनी पूनमसह तिच्या चुलत भावांवर प्राणघातक हल्ला केला.
या हल्ल्यात पूनमचे चुलत भाऊ चांगलेच जखमी झाले आहेत. तर पूनम यामधून कशीबशी वाचून बाहेर पडली. यावेळी तिला संरक्षण देण्यासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तिला या हल्ल्यापासून वाचवलं.
या हल्ल्यावेळी परिसरात मोठी तोडफोडही करण्यात आली. यात अनेक गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधिक्षक घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलिसांनी तिला संरक्षण दिलं असून हल्लेखोरांवर पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पूनम यादवने 69 किलो वजनी गटातून सुवर्ण पदकाची कमाई केली होती. पूनमने 222 किलो वजन उचलून सुवर्णपदकाला गवसणी घातली. तिने स्नॅचमध्ये 100 किलो, तर क्लीन अँड जर्कमध्ये उचललं 122 किलो वजन उचललं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement