एक्स्प्लोर

अखेर मिलिंद एकबोटे यांना अटक, घरी जाऊन पोलिसांची कारवाई!

पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना घरी जाऊन अटक केली.

पुणे: भीमा कोरेगाव हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेल्या मिलिंद एकबोटे यांना अखेर अटक झाली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना घरी जाऊन अटक केली. काही वेळापूर्वीच सुप्रीम कोर्टाने मिलिंद एकबोटे यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही वेळातच पोलिसांनी एकबोटेंना अटक केली. यापूर्वी हायकोर्टानेही एकबोटेंचा जामीनअर्ज फेटाळला होता. त्यामुळे एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता होती. राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात अहवाल सादर करुन, एकबोटे तपासात सहकार्य करत नसल्याचं म्हटलं होतं. या अहवालावरुन सुप्रीम कोर्टाने एकबोटेंना जामीन देण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारीच भीमा कोरेगाव हिंसाचाराबाबत निवेदन दिलं होतं. “मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल केला, फरार झाल्यावर कोंबिंग ऑपरेशन केले. शिवाय, जिथे जिथे न्यायालयात जामिनासाठी एकबोटे गेले, सरकारने तिथे तिथे चांगले वकील नेमत विरोध केला. उलट आम्ही कोठडी मागून चौकशीची मागणी केली आहे.”, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. काय आहे प्रकरण? एक जानेवारी 2018 रोजी  कोरेगाव भीमा इथं शौर्यस्तंभाला वंदन करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर सणसवाडीत दीड ते दोन हजारांच्या जमावाने हल्ला केला. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या जमावाला मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे गुरुजी यांनी चिथावल्याचा आरोप आहे. एकबोटे यांच्या विरोधात पिंपरी आणि औरंगाबाद या दोन ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे दोन्ही गुन्हे शिक्रापूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आले आहेत. ज्या दिवशी ही घटना झाली त्यावेळेस आपण तिथं नव्हतो, तसेच आपल्या झालेल्या घटनेत कोणताही सहभाग नसल्याचा दावा एकबोटे यांनी केला आहे. एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुण्यातील सत्र न्यायालयाने 22 जानेवारीला फेटाळला. त्यामुळे मिलिंद एकबोटे यांनी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. हायकोर्टानेही दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर मिलिंद एकबोटेंनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

संबंधित बातम्या :

एकबोटेंना अटक का केली नाही?, विश्वास नांगरे पाटलांचं उत्तर...

महाराष्ट्र सरकारच्या एकबोटे बचाव धोरणाचे सुप्रीम कोर्टात धिंडवडे

मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी

दगडफेकीप्रकरणी भिडे गुरुजी, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा

मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता

मिलिंद एकबोटेंच्या शोधात पोलिसांचा हलगर्जीपणा

 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde: 'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie ReportBharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde: 'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
'मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा', धनंजय मुंडेंचा राष्ट्रवादीच्या अधिवेशनातून सुरेश धसांना इशारा
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Dhananjay Munde: पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
पक्ष संकटकाळात खंबीरपणे पाठीशी उभा, धनुभाऊंना गलबलून आलं; म्हणाले, माझ्या देहावरील अग्नीच्या धुरानेही उपकारांची परतफेड होणार नाही
Dhananjay Munde : पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
पालकमंत्रिपद जाताच धनंजय मुंडेंचं खळबळजनक वक्तव्य, म्हणाले, 'मी अजितदादांना सांगत होतो भाजपसोबत जाऊ नका, हे षडयंत्र...'
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Embed widget