एक्स्प्लोर

Amit Shah : CAA मुळे मुस्लिमांची नागरिकता रद्द होणार का? काय म्हणाले अमित शाह

Citizenship Amendment Act : आंतरराष्ट्रीय स्तरावर सीएए कायद्याला मुस्लिम विरोधी कायदा असं संबोधलं जात आहे, पण त्यात काहीही तथ्य नसल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्ट केलं.

Amit Shah on CAA : देशात नागरिकता सुधारणा अधिसूचना (Citizenship Amendment Act) लागू झाल्यानंतर अनेक समूदायात संभ्रम आहे, विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केल्याचं दिसून येतंय. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. सीएए कायद्यामुळे कुणाचंही नागरिकत्व जाणार नाही, कुणीही घाबरण्याची गरज नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक पैलूवर चर्चा केली. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं की, नागरिकत्व दुरुस्ती अधिसूचनेबाबत (CAA) विरोधक राजकारण करत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू करण्याच्या वेळेवर विरोधक सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. असदुद्दीन ओवैसी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्वजण यावर राजकारण करत आहेत. सीएएवर विरोधक केवळ आपली व्होट बँक नजरेसमोर ठेवून वक्तव्य करत असल्याचा आरोप अमित शाह यांनी केला.

विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप

अमित शाह म्हणाले की, 'ओवैसी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह सर्व विरोधी पक्ष यावर राजकारण करत आहेत. सीएए हा आताच, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी का लावला असा प्रश्न विचारत आहेत. पण भाजपने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की ते CAA कायदा लागू केला जाईल, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देण्यात येईल.

कोविडमुळे अंमलबजावणी नाही

पाच वर्षांपूर्वी म्हणजे 2019 मध्येच CAA संसदेत मंजूर करण्यात आला होता, परंतु कोविडमुळे त्याची अंमलबजावणी लांबणीवर पडली असं अमित शाह यांनी स्पष्ट केलं. अमित शाह म्हणाले की, "विरोधकांना तुष्टीकरणाचे राजकारण करायचे आहे आणि आपली व्होट बँक मजबूत करायची आहे. त्यांचा पर्दाफाश झाला आहे आणि देशातील लोकांना माहित आहे की CAA हा या देशाचा कायदा आहे. निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी होईल असं मी गेल्या 4 वर्षांत 41 वेळा सांगितले आहे."

मोदी जे काही बोलले ती काळ्या दगडावरची रेष

विरोधक आरोप करत आहेत की भाजप सीएएद्वारे नवीन व्होट बँक तयार करत आहे असा आरोप केला जात आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना अमित शहा म्हणाले की, "विरोधकांकडे दुसरे काम नाही, सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करण्यात भाजपचा राजकीय फायदा आहे, मग आम्ही दहशतवादावर कारवाई करू नये का? कलम 370 हटवणं हेही आमच्या राजकीय फायद्यासाठी होतं का?"

भाजपच्या आश्वासनांची आठवण करून देत अमित शाह म्हणाले की, "आम्ही 1950 पासून म्हणत आलो आहोत की आम्ही कलम 370 हटवू. विरोधी पक्ष सांगतात तसे न करण्याचा इतिहास आहे. मोदीजींचा इतिहास असा आहे की ते जे काही बोललात ती काळ्या दगडावरची रेष होते. मोदींची प्रत्येक हमी पूर्ण झाली."

अल्पसंख्याकांना CAA घाबरण्याची गरज नाही

सीएए अधिसूचना जारी झाल्यानंतर यामुळे लोकांचे नागरिकत्व गमावले जाईल असा गैरसमज पसरविला जात आहे. त्यावर बोलताना अमित शहा म्हणाले की, 'अल्पसंख्याकांनी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीला घाबरण्याची गरज नाही, कारण CAA मध्ये कोणाचेही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. CAA केवळ अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील हिंदू, बौद्ध, जैन, शीख, ख्रिश्चन आणि पारशी निर्वासितांना हक्क आणि नागरिकत्व देण्यासाठी आहे.

CAA ला 'मुस्लिम विरोधी' कायदा म्हणण्यावर गृहमंत्री काय म्हणाले?

मुलाखतीदरम्यान गृहमंत्र्यांना विचारण्यात आले की सीएएला आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये 'मुस्लिम विरोधी' कायदा म्हटले जात आहे, यावर तुम्ही काय म्हणाल? अमित शहा यावर स्पष्टीकरण देताना म्हणाले की, "तुम्ही या कायद्याकडे एकाच बाजून पाहू शकत नाही. 1947 मध्ये धर्माच्या आधारावर फाळणी झाली. स्थलांतरित झालेले लोक कधीही परत येऊ शकतात, असे काँग्रेस नेत्यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काँग्रेसने दिलेले आश्वासन कधीही दिलेले  पूर्ण केले नाही. पण आज पंतप्रधान मोदींनी ते पूर्ण केले."

ही बातमी वाचा : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Mahalakshmi Race Course वर थीम पार्कचा मार्ग मोकळा,120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरीMajha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 26 June 2024Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
Mumbai Crime: परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
परळच्या प्रसिद्ध मेडिकल शॉपच्या मालकाला 'सीबीआय' अधिकाऱ्याचा फोन, घाबरुन 1.30 कोटी देऊन टाकले अन्...
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Embed widget