एक्स्प्लोर
Advertisement
AIADMK चे दोन गट एकत्र, आणखी एक राज्य एनडीएच्या ताब्यात?
एआयएमडीएके पक्षातील दोन गट एकत्र आल्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. कारण एआयएडीएमके आता एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे.
चेन्नई : तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष एआयएडीएमकेचे दोन गट जवळपास सहा महिन्यांनी एकत्र आले आहेत. ज्यामध्ये एका गटाचं नेतृत्व मुख्यमंत्री के. पलनीस्वामी आणि दुसऱ्या गटाचं नेतृत्व माजी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांच्याकडे आहे. पक्ष मुख्यालयात या विलिनीकरणाची घोषणा करण्यात आली.
पन्नीरसेल्वम यांनी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून त्यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर एआयएडीएमके पक्ष दोन गटात विभागला गेला होता. मात्र आता विलिनीकरणानंतर पन्नीरसेल्वम पक्षाचे समन्वयक असतील, तर पलानीस्वामी संयुक्त समन्वयक असतील. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशीकला यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
शशीकला आणि त्यांच्या नातेवाईकांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी अट पन्नीरसेल्वम गटाने विलिनीकरणासाठी घातली होती.
... तर देशातील 74 टक्के लोकसंख्येवर एनडीएचं राज्य
या राजकारणाचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. एआयएडीएमके एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याचं आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. यामुळे आणखी एक राज्य एनडीएच्या ताब्यात जाईल. म्हणजे एआयएडीएमके एनडीएसोबत आल्यानंतर देशातील 74 टक्के लोकसंख्येवर एनडीएचं राज्य असेल.
भाजपची सत्ता असलेली राज्य
- उत्तर प्रदेश
- मध्य प्रदेश
- राजस्थान
- महाराष्ट्र
- गुजरात
- झारखंड
- आसाम
- छत्तीसगड
- हरियाणा
- उत्तराखंड
- मणिपूर
- अरुणाचल प्रदेश
- गोवा
- आंध्र प्रदेश
- जम्मू-काश्मीर
- सिक्कीम
- नागालँड
- बिहार
- तामिळनाडू
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement