एक्स्प्लोर

अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या 4 दहशतवाद्यांना बेड्या, घातपाताचा कट उधळला, चौघेही श्रीलंकन

Ahmedabad News : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे.

Ahmedabad News : अमहदाबाद एटीएसने आयएसआयएसच्या चार दहशतवाद्यांना बेड्या ठोकल्या आहेत. अहमदाबाद विमानतळावरुन चार दहशतवाद्यांना एटीएसने अटक केली आहे. अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी मूळचे श्रीलंकेचे आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी 2023 मध्ये एटीएसने राजकोटमधून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या होत्या. ते तिन्ही दहशतवादी बांगलादेशी हँडलकरसाठी काम करत होते. दहशतवादी संघटनेसाठी लोकांची भरती करण्यात त्यांचा सहभाग होता. ते तिन्ही आरोपी तरुणांना कट्टरतावादी करत तयार करत होते.

एबीपी माझाचे सहयोगी संकेतस्थळ एबीपी अस्मिताने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले चारही दहशतवादी श्रीलंकेतून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचले. पाकिस्तानी हँडलरच्या आदेशानंतर त्यांनी काहीतरी कट आखला होता. त्यामुळे हे दहशतवादी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोणत्या उद्देशाने पोहोचले होते, याचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.

चेन्नईमार्गे अहमदाबादमध्ये दाखल -

गुजरात पोलिसांच्या मदतीने एटीएसने चार आरोपींना बेड्या ठोकल्या. गुजरात पोलिसांतील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतामध्ये मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या इराद्याने श्रीलंकेतून दहशतवादी पाठवण्यात आले होते. ते श्रीलंकेहून चेन्नईमार्गे अहमदाबादला पोहोचल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गुजरात एटीएसने मिळालेल्या माहितीच्या आधारावर चारही आरोपींना बेड्या ठोकल्या. दहशतवाद्यांना टार्गेट लोकेशनवर पोहचण्याआधीच ताब्यात घेण्यात आलेय. अहमदाबाद विमानतळावरून इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांना अटक केली.

एटीएसच्या हातात मोठा पुरवा -

अटक करण्यात आलेले चारही पाकिस्तानमधील हँडलरच्या संपर्कात होते. त्यांनी मोठा कट आखला होता. हे दहशतवादी पाकिस्तानातील आदेशाची वाट पाहत होते, असेही समोर आले आहे. या दहशतवाद्यांना शस्त्रेही स्वतंत्रपणे पोहोचवली जाणार होती. एटीएसने या दहशतवाद्यांच्या फोनमधून एन्क्रिप्टेड चॅट जप्त केले आहेत. एटीएसकडून चारही दहशतव्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. चॅट्समधून बरीच माहिती उघड झाली आहे. 

गुजरात पोलिस अलर्ट मोडवर -

सुरत पोलिसांकडून मौलवी सोहेल अबुबकरच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. त्यावेळीच गुजरातमध्ये चार ISIS दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. पण हे दहशतवादी अहमदाबादमध्ये पोहोचल्यानंतर गुजरात पोलीस अलर्ट मोडमध्ये आले आहेत. गुजरात पोलिसांकडून सर्व यंत्रणा अलर्टमोडवर ठेवण्यात आल्या आहेत. बारकाईने सर्व ठिकाणी लक्ष देण्यात येत आहे.  

आयपीएल सामन्याआधीच अटक - 

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर 21 मे रोजी आयपीएलमधील प्लेऑफचा सामना होणार आहे. हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात ही लढत होणार आहे. खेळाडू अहमदाबाद विमानतळावर दाखल होणार होते, काही झाले आहे. त्यावेळीच एटीएसने चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. दहशतवाद्यांचा नेमका काय कट होता? याबाबत चौकशी कऱण्यात येत आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
Embed widget