एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गुजरातचा रणसंग्राम : GCU निवडणुकीत अभाविपचा दारुण पराभव
गुजरात सेंट्रल विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत रा.स्व. संघ आणि भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव झाला आहे.
अहमदाबाद : गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पण दुसरीकडे निवडणुकीपूर्वीच भाजपला जोरदार दणका बसला आहे. कारण, गुजरात सेंट्रल विद्यापीठातील विद्यार्थी निवडणुकीत रा.स्व. संघ आणि भाजपशी संबंधित विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव झाला आहे.
या निवडणुकीत सर्व जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय झाला आहे. यातील सर्वाधिक उमेदवार हे दलित आणि डाव्या विचारसरणी मानणाऱ्या संघटनेशी संबंधित आहेत.
नॅशनल हेरॉल्डच्या वृत्तानुसार, विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेसाठी अभाविपुने आपले उमेदवार उभे केले होते. तर काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयूआयने अपक्ष उमेदवारांना समर्थन दिलं होतं. दुसरीकडे बसपा आणि एलडीएसएफ सारख्या दलित आणि डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी अभाविपविरोधात उमेदवार उभे केले होते.
या निवडणुकीत विद्यापीठाच्या सर्वाधिक महत्त्वाचा आणि मोठा विभाग असलेल्या स्कूल ऑफ सोशल सायन्समधून अपक्ष उमेदवार दिलीप कुमारचा विजय झाला. तर स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून अपक्ष उमेदवार अरविंद नामपूथिरी विजयी झाला. याशिवाय इतर विभागातूनही अपक्ष उमेदवारांनी अभाविपच्या उमेदवारांचा दारुण पराभव केला.
दरम्यान, गेल्या काही दिवसात देशातील विविध विद्यापीठांमध्ये झालेल्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत अभाविपला पराभवाचा समाना करावा लागला आहे. दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत अभाविपला अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचं पद गमवावं लागलं. तर राजस्थान विद्यापीठाच्या निवडणुकीत अध्यक्ष पदासह सर्व तीन जागांवरही अभाविप उमेदवारांचा दारुण पराभव झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement