ABP Ideas of India Live : 'एबीपी'वर देशाच्या विकासाचा रोडमॅप; दिग्गजांसोबत संवाद
ABP Ideas of India Summit 2022 Day 1 Live : एबीपी नेटवर्कच्या व्यासपीठावर दिग्गजांसोबत संवाद, आमीर खान, गौर गोपाल दास यांचीही उपस्थिती, एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर आज आणि उद्या आयडीयाज ऑफ इंडिया समिट
LIVE
Background
ABP Ideas Of India : सध्या देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत आहे. स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षानिमित्त ABP नेटवर्क विविध क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणत आहे. ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील विचारप्रवर्तक लोक आणि उत्कृष्ट विचारसरणी या मंचावर पाहायला मिळणार आहे. हे दिग्गज भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलणार असून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दृष्टी शेअर करणार आहेत.
'आयडियाज ऑफ इंडिया' समिटमध्ये मुक्त विचारांच्या थीमसह, कॉन्क्लेव्हमध्ये दररोज किमान 10 सत्रं असतील. ज्यामध्ये विविध क्षेत्रांतील दिग्गज त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतील. दोन्ही दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून समिट सुरू होईल. 25 आणि 26 मार्च रोजी होणार्या ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'ची पहिलं सत्र भारतासाठीच्या नवीन कल्पनांबद्दल बोलण्यासाठी एक व्यासपीठ आहे.
प्रमुख वक्त्यांमध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi), सोनम वांगचुक (Sonam Wangchuk), प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास (Gaur Gopal Das), इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती (N.r. Narayana Murthy), प्रसिद्ध पत्रकार फरीद झकेरिया (Fareed Zakaria), काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor), पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा समावेश असेल. शिक्षण जगताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार, लीड सीईओ सुमित मेहता आणि अपग्रेडचे सह-संस्थापक फाल्गुन कोंपली करतील.
याव्यतिरिक्त कपिल देव, जफर इक्बाल आणि लिएंडर पेस खेळाबद्दल बोलतील. मनोरंजन जगतातील उषा उथुप आणि गायकांमध्ये नवीन वयाचे कलाकार पेपॉन आणि जसलीन रॉयल, व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यम, चित्रपट दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan), आनंद एल राय, नागेश कुकुनूर आणि रमेश सिप्पी आणि अभिनेते तापसी पन्नू, अभिनेता आमिर खान यांचा समावेश असेल.
'एबीपी आयडीयाज ऑफ इंडिया समिट' कुठे पाहाल?
'एबीपी आयडीयाज ऑफ इंडिया समिट'चं तुम्ही abplive.com वर आज आणि उद्या थेट प्रक्षेपण पाहू शकता
मी अभिनेता नसतो तर साधू झालो असतो, नवाझुद्दिन सिद्दिकीने केला अनेक गोष्टींचा खुलासा
अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी म्हणाला आहे की, ''मी अभिनेता झालो नसतो तर साधू झालो असतो. मी दोन ते तीन वेळा धर्मशाळेत जाऊन साधू बनण्याचा प्रयत्न देखील केला.''
भारत 2030 पूर्वी 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकतो, नीती आयोगच्या उपाध्यक्षांनी वर्तवली शक्यता
नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहेत की, ''जर कोरोनाची चौथी लाट आली नाही, तर भारतीय अर्थव्यवस्था 8 टक्के दराने वाढेल. तसेच पुढील आठ वर्षांपेक्षा कमी कालावधीत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊ शकते. अशा परिस्थितीत 2030 पूर्वी भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकतो.''
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणे गायले
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणेच योग्य आहे, असं तो म्हणाला आहे. यावेळी त्याने एबीपीच्या मंचावर हे गाणे सादर देखील केले. याशिवाय त्यांनी यापूर्वी 'आज जाने की जिद ना करो' गाऊनही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आजच्या काळातील कच्चा बदाम आणि बचपण का प्यार या गाण्यांबाबत तो म्हणाला की, मी हे सर्व ऐकलं नाही, संगीतात जे चांगले आहे. ते कायम राहील आणि जे निरुपयोगी आहे, ते नाहीसे होईल, असे मला वाटते.
मी आजकाल गुलजारसाहेबांना भेटतोय- पपॉन
प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्याबद्दल बोलता पपॉन म्हणाला आहे की, आजकाल गुलजारसाहेबांना भेटल्यावर त्यांनी जे सांगितले होते. ते आठवते की, 'लकीरें हैं रहने दो- किसी ने खींची थी.' ... मात्र संगीतासोबत रेषाही पुसल्या जातात आणि दुरावाही संपतो. संगीत संस्कृतींमध्ये भेदभाव करत नाही आणि संगीतामध्ये कोणामधीलही अंतर भरून काढण्याची ताकद आहे. यावेळी त्याने एक कुमाओनी गाणे गायले. जे आसाममधील पहाडी गाणे म्हटले जाते.
माझं कोणतंही बॉलीवूड ड्रीम नव्हतं : पपॉन
या कार्यक्रमात बोलता पपॉन म्हणाला आहे की, ''माझ्या पहिल्या गाण्यानंतर मला 3 वर्षे दुसरे कोणतेही गाणे मिळाले नाही. म्हणून मला वाटले की कदाचित माझ्या आवाजात बॉलीवूड वाली बात नसेल. मात्र याशी मला कोणतीही अडचण नव्हती. करण माझं कोणतंही बॉलीवूड ड्रीम नव्हतं. मी जेव्हाही आसाममध्ये गायचो तेव्हा असे म्हटले जायचे की, मी येथील मुलगा आहे, तर गाणारच. मात्र मी दिल्लीचा आभारी आहे की, इथल्या लोकांना माझा आवाज आवडला. मी इथे बँडसोबत कामही केलं.''