एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर 7 वर्षीय चिमुरडीचं पंतप्रधानांना पत्र
बंगळुरु : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांना पाठिंबा दिला जात आहे. बंगळुरुतल्या एका सात वर्षांच्या चिमुरडीनेही पंतप्रधानांना पत्र लिहून त्यांचं कौतुक केलं आहे.
कर्नाटकातील बंगळुरुत राहणाऱ्या सात वर्षांच्या श्रेयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. मी तुमची खूप मोठी फॅन आहे, असं श्रेयाने लिहिलं आहे. काळा पैसा रोखण्यासाठी नोटाबंदीबाबत तुम्ही घेतलेल्या निर्णयाला माझा पाठिंबा आहे, असं श्रेया म्हणते.
'ते सगळ्यांना पाठिंबा देतात, म्हणून मला त्यांना पाठिंबा द्यायचा आहे. नोटाबंदीमुळे गरीबांचा फायदा होत आहे, त्यामुळे माझा या निर्णयाला पाठिंबा आहे' असंही श्रेयाने सांगितलं आहे. 'मला स्वच्छ भारत हवा आहे. मी मोदीजींची मोठी चाहती असल्याचं मी लिहिलं आहे. त्यांना माझं गिफ्ट आवडेल' अशी आशा श्रेयाने व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
राजकारण
क्राईम
मुंबई
Advertisement