एक्स्प्लोर
पंजाबमध्ये भारत-पाक सीमेजवळ 2 हजारांची बनावट नोट सापडली!
चंदीगड (पंजाब) : पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान सीमेजवळ तरन तारण जिल्ह्यात दोन व्यक्तींना 2000 रुपयांच्या बनावट नोटांसह अटक करण्यात आली. या दोन व्यक्तींकडे 2 हजार रुपयांच्या नोटांच्या रंगीत फोटोकॉपी होत्या. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्याला अद्याप एक आठवडही उलटला नाही, तोच बनावट नोटा सापडू लागल्या आहेत.
पंजाब पोलिसांच्या माहितीनुसार, हरजिंदर सिंह आणि संदीप या दोन व्यक्तींना 2 अमृतसरपासून 40 किलोमीटर अंतरावरील भिखीविंड गावातून अटक करण्यात आली. 2 हजार रुपयांच्या बनावट नोटा या दोघांकडे सापडल्या.
8 नोव्हेंबर 2016 रोजी मोदी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणल्या. नव्या नोटा चलनात आणल्याला अद्याप एक आठवडाही उलटला नाही.
“अनेक लोकांनी अद्याप 2 हजार रुपयांच्या नव्या नोटा पाहिल्याही नाहीत. त्यामुळे काही लोक याचा गैरफायदा उचलताना दिसत आहेत. बनावट नोटा बाजारात खपवण्याचे प्रयत्न सुरु आहे.”, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली.
पंजाबमध्ये सापडलेल्या या बनावट नोटा मूळ नोटेची रंगीत कॉपी आहे. पोलिसांनी नोट, प्रिंटर, स्कॅनर आणि कॉम्प्युटर जप्त केले आहेत. शिवाय, आरोपींविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पंजाब पोलिसांकडून पुढील तपास सुरु करण्यात आले असून, आणखी काही जणांना यात अटक होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement