एक्स्प्लोर
गोव्यातील काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर?
आम्हाला गोवा सरकार स्थिर ठेवायचे आहे व त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आम्ही भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही, असं स्पष्टीकरण गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिलं
![गोव्यातील काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर? 10 Congress MLAs in Goa were supposed to enter BJP गोव्यातील काँग्रेसचे 10 आमदार भाजपच्या वाटेवर?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/12230520/BJP-Goa.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पणजी : विरोधी काँग्रेस पक्षाच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार होता मात्र आमच्या पक्षश्रेष्ठींनी त्याला मान्यता दिली नाही. आम्हाला कोणताच पक्ष अस्थिर करायचा नाही, असा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी बुधवारी केला.
काँग्रेसचे आमदार फोडण्यासाठी बरेच कोटी रुपये भाजपने आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी नुकताच केला होता. आमच्याकडे रेकॉर्डिंगही आहे, असा दावा चोडणकर यांनी केला होता. मात्र चोडणकर हे काहीही आरोप करत आहेत. त्यांनी रेकॉर्डिंग असल्यास जाहीर करावे. रेकॉर्डिंगमधील आवाज कुणाचा ते तरी कळून येईल, असं तेंडुलकर म्हणाले.
ज्यावेळी सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले, तेव्हाही पैशांचा व्यवहार झाला नव्हता. आता आम्ही कुणीच भाजप नेते काँग्रेसच्या कुठच्याच आमदाराशी चर्चा देखील केलेली नाही. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारकडे एकूण तेवीस आमदारांचे संख्याबळ आहे आणि तेवढे संख्याबळ स्थिर सरकारसाठी एकदम पुरेसे आहे,असे तेंडुलकर म्हणाले.
पंधरा दिवसांपूर्वी काँग्रेसच्या दहा आमदारांचा गट भाजपमध्ये विलीन होण्यास तयार झाला होता. आम्ही आणि भाजपच्या केंद्रीय नेत्यांनीही यास मान्यता दिली नाही. चोडणकर यांचे काँग्रेसच्या कुठच्याच आमदारावर नियंत्रण राहिलेले नाही. काँग्रेसचे आमदार सैरभैर आहेत. कारण त्यांना ठाऊक आहे, की देशात आणि गोव्यातही पुढील पंचवीस वर्षे भाजपचीच सत्ता राहणार आहे. आम्हाला गोवा सरकार स्थिर ठेवायचे आहे व त्यासाठी काँग्रेसच्या आमदारांना आम्ही भाजपमध्ये घेण्याचा प्रश्नच येत नाही. फ्रान्सिस सिल्वेरा किंवा क्लाफास डायस हे जी वक्तव्ये करत आहेत, त्यांना आम्ही रोखू शकत नाही पण आम्ही पक्षात कुणाला घेणार नाही, असंही तेंडुलकर म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)