चीनने पुन्हा बदलला गेम, Apple पुन्हा वरच्यास्थानी; तर NVIDIAला जबर धक्का; भारताचा TCS कुठे? जाणून घ्या सविस्तर
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मार्केट कॅप १२.४१ लाख कोटी रुपये (सुमारे $150 अब्ज) आहे. तथापि, हा आकडा अजूनही जागतिक टॉप १० मध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसा नाही.

तंत्रज्ञानाच्या जगात मोठी उलथापालथ झाली आहे. मार्केट कॅपच्या बाबतीत अॅपल पुन्हा एकदा जगातील सर्वात मोठी टेक कंपनी बनली आहे. $3.17 ट्रिलियन बाजारमूल्यासह, अॅपलने दाखवून दिले आहे की तंत्रज्ञानाच्या जगात त्यांचे वर्चस्व अजूनही कायम आहे. त्याच्या अगदी खालोखाल मायक्रोसॉफ्ट आहे, ज्याचे मूल्य $2.92 ट्रिलियन आहे. पण खरं नाट्य NVIDIA सोबत घडलंय. 2024 मध्ये, या कंपनीने अॅपल आणि मायक्रोसॉफ्ट दोघांनाही मागे टाकून नंबर एकचे स्थान पटकावले होते. पण 2025 च्या सुरुवातीला, डीपसीक (DeepSeek) नावाच्या एका चिनी कंपनीने अशी तांत्रिक झेप घेतली की NVIDIA चे मूल्य एकाच दिवसात 600 अब्ज डॉलर्सने घसरले. आता ते तिसऱ्या स्थानावर घसरले आहे, त्याचे सध्याचे बाजार मूल्य $2.66 ट्रिलियन आहे.
चिनी कंपनीने बदलला खेळ
दरम्यान, 2024 मध्ये, NVIDIA, Apple आणि Microsoft ला मागे टाकून जगातील सर्वात मोठी कंपनी बनली होती. पण जानेवारी 2025 मध्ये, चिनी एआय (AI) कंपनी डीपसीकने (DeepSeek) मिळवलेल्या यशामुळे एनव्हीआयडीएला (NVIDIA) असा धक्का बसला की त्याचे बाजारमूल्य फक्त एका दिवसात 600 अब्ज डॉलर्स (सुमारे 50 लाख कोटी रुपये) ने घसरले आहे.
टॉप 10 मध्ये कोणत्या कंपनी?
टॉप 10 कंपनीमध्ये बहुतेक अमेरिकन कंपन्यांचे वर्चस्व आहे. शिवाय, आशियातील अनेक कंपन्यांनीही या यादीत स्थान मिळवले आहे. टॉप कंपन्यांच्या यादीत Amazon ($1.988 ट्रिलियन), Google (अल्फाबेट) ($1.953 ट्रिलियन), Meta (Facebook) ($1.399 ट्रिलियन), Tesla ($940.61 अब्ज), TSMC (तैवान, $853.08 अब्ज) आणि Tencent (चीन, $555.29 अब्ज) यांचा समावेश आहे.
भारताचा अभिमान असलेली टीसीएस कुठल्या स्थानी?
भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS)चे मार्केट कॅप 12.41 लाख कोटी रुपये (सुमारे $150 अब्ज)आहे. शिवाय, हा आकडा अजूनही जागतिक टॉप 10 मध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसा नाही. परिणामी आगामी काळात मार्केटमध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
(Disclaimer : येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. येथे हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की बाजारात गुंतवणूक करणे हे बाजारातील जोखमींच्या अधीन आहे. गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमीच तज्ञांचा सल्ला घ्या. ABPLive.com कधीही कोणालाही येथे पैसे गुंतवण्याचा सल्ला देत नाही.)
हे ही वाचा























