2000 रुपयांच्या नोटा बंद तरीही 6266 कोटी रुपयांच्या नोटा चलनात, RBI च्या अहवालातून महत्वाची माहिती समोर
2 हजार रुपयांची नोट बंद होऊन जवळजवळ दोन वर्षे झाली आहेत, तरीदेखील 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात असल्याची माहिती समोर आली आहे.

2000 Rupee Notes News : मे 2023 मध्ये सरकारने 2 हजार रुपयांची नोट (Note) पूर्णपणे बंद केली होती. 2 हजार रुपयांची नोट बंद होऊन जवळजवळ दोन वर्षे झाली आहेत. 2 हजार रुपयांच्या नोटेमुळं लोकांना व्यवहारात खूप अडचणी येत होत्या, कारण बहुतेक लोकांकडे 2 हजार रुपयांचे चलन नव्हते. दरम्यान, रिझर्व्ह बँकेनं एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात रिझर्व्ह बँकेने 2 हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर दोन वर्षे उलटूनही 6 हजार 266 कोटी रुपयांच्या नोटा अजूनही चलनात असल्याची माहिती समोर आली आहे.
19 मे 2023 रोजी 2000 च्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या
2 हजार रुपयांच्या बँक नोटा कायदेशीर चलनात राहतील. 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकण्याची घोषणा आरबीआयने केली होती. आरबीआयने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 30 एप्रिल 2025 पर्यंत, सध्या 2000 रुपयांच्या एकूण 6266 कोटी रुपयांच्या नोटा चलनात आहेत. 19 मे 2023 पर्यंत, त्यावेळी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या बँक नोटांचे एकूण मूल्य 3.56 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, 19 मे 2023 रोजी चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या 98.24 टक्के नोटा परत आल्या आहेत.
कुठे जमा कराल 2000 रुपयांचा नोटा?
7ऑक्टोबर 2023 पर्यंत देशातील सर्व बँक शाखांमध्ये 2 हजार रुपयांच्या बँक नोटा जमा करण्याची किंवा बदलण्याची सुविधा उपलब्ध होती. त्यानंतर 19 मे 2023 पासून रिझर्व्ह बँकेच्या 19 जारी कार्यालयांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. 9 ऑक्टोबर 2023 पासून आरबीआयची जारी कार्यालये व्यक्ती आणि संस्थांकडून त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी 2000 रुपयांच्या नोटा स्वीकारत आहेत. याशिवाय, लोक भारतीय पोस्टाद्वारे देशातील कोणत्याही आरबीआय इश्यू ऑफिसमध्ये 2000 रुपयांच्या नोटा पाठवू शकतात. हे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा होतात.
महत्वाच्या बातम्या:
























