एक्स्प्लोर

Maratha Youth Suicide : मराठवाडा हादरला! मराठा आरक्षणासाठी एकाच दिवसांत तिघांची आत्महत्या

Maratha Youth Suicide : बुधवारी मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, राज्यभरात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, याचवेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील काही दिवसांत अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले आहे. तर, बुधवारी मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जालना येथील अंतरवाली टेंभी गावातील शिवाजी किसन माने (वय 45 वर्षे),  छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर (वय 28 वर्षे) आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय 25 वर्षे) यांनी आपलं जीवन संपवलं आहे. 

पहिली घटना... 

जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी असलेल्या मराठा तरूणाने आत्महत्या केली आहे. उपोषण सुरु असतांना मंडपातून उठून थेट घर गाठत दरवाजाच्या कोंड्याला दोरी लावून गळफास घेत या तरुणाने आत्महत्या केली. शिवाजी किसन माने आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सरकारला वेळ देऊनही मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण करू शकत नाही, या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले. ही घटना आज गुरवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अंतरवाली टेंभी गावात घडली.

दुसरी घटना... 

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथे एका मराठा तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तसेच. "जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका," असा मजकूर आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पाटीवर लिहून ठेवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले (चार व सहा वर्षाची ) आई-वडील व भाऊ असा परिवार आहे. त्यांना दोन एकर शेती असून या शेतीच्या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह ते भागवत होते. दरम्यान, या घटनेनंतर गावकरी आक्रमक होतांना पाहायला मिळाले. तर, धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आपतगाव फाट्यावर रास्ता रोको करून टायर देखील पेटवून देण्यात आले. 

तिसरी घटना...

मराठा आरक्षण मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहे, अशी चिठ्ठी खिशात लिहून ठेवत एका युवकाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे गुरुवारी सकाळी घडली. मयत युवकाचे नाव लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर असे आहे. आरक्षणासाठी सरकार वेळ लावत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूणांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे. या नैराश्यातूनच देवजना शिवारातील शेतामधील एका झाडाला लहू उर्फ कृष्णा कल्याणकर याने गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे, असा उल्लेख आहे. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

गावबंदी असतानाही ताफा गावात, खासदार प्रताप पाटलांच्या गाड्यांची तोडफोड; गावात पोलिसांचा बंदोबस्त

महत्त्वाच्या बातम्या

Chhatrapati Sambhaji nagar Crime Bunty Dixit Case: छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
छत्रपती संभाजीनगरमधील फेसबुक किंग बंटी दीक्षितचा भयानक शेवट, मित्रानेच संपवलं, लोखंडी रॉडने चेहरा बिघडवून टाकला
Chhatrapati Sambhajinagar Crime News: लोखंडी रॉडने डोकं, चेहरा आणि मानेवर वार; दांडिया खेळताना भयानक घडलं, मैत्रीचा रक्तरंजित शेवट; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
लोखंडी रॉडने डोकं, चेहरा आणि मानेवर वार; दांडिया खेळताना भयानक घडलं, मैत्रीचा रक्तरंजित शेवट; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना
Chhatrapati Sambhajinagar Crime News: जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट, 2 जणांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावात थरकाप उडवणारी घटना
जुन्या वादाचा रक्तरंजित शेवट, 2 जणांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगावात थरकाप उडवणारी घटना
Mahayuti: आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..
आपण एकत्र आहोत, तर वेगळी भूमिका का? पक्षाच्या दृष्टीने हे कृत्य योग्य नाही; छत्रपती संभाजीनगरच्या महायुतीतील नाट्यमय घडामोडींवर देवेंद्र फडणवीसांचे खडे बोल, म्हणाले..

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
पुण्यातील धक्कादायक घटना; नववीतील विद्यार्थ्याचा अल्पवयीन मुलीवर चाकूने हल्ला, रिल्स ठरलं कारण
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
बिग बी अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोरुन एक संशियत ताब्यात, चौकशी सुरू; टायगरवरील हल्ल्यानंतर सुरक्षेत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
Video: एकनाथ शिंदे अन् त्यांच्या मुलाबद्दल तुम्ही मागे काय बोलता ह्याच्या क्लिप आमच्याकडे; प्रसाद लाड यांचा रामदास कदमांना इशारा
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
एकनाथ शिंदेंना संपवण्याची सुपारी रामदास कदम यांनीच घेतली की काय? ऑडिओ क्लिपवरुन जुंपली, प्रसाद लाड यांचा पलटवार
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
झोपडपट्टीवासीयांना “सर्व काही मोफत मिळत आहे आणि त्यांना शहरातील मोक्याच्या भागांमध्येच पुनर्वसन हवं आहे” : मुंबई उच्च न्यायालयाची टिप्पणी
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
टायगर श्रॉफवर हल्ल्यासाठी आरोपींना पिस्तुल कुठून मिळालं? पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Navi Mumbai Crime News: नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर थरार; लग्नाला नकार दिला अन् वाद, बसची वाट पाहणाऱ्या तरुणीला बॉयफ्रेंडनं संपवलं, 4 वर्षांच्या प्रेमाचा भयानक शेवट
Embed widget