ATM मधील पैसे चोरायला गेले, गॅस कटरची नळी चुकून फिरली अन् 13 लाखांच्या नोटा चोरट्यांच्या डोळ्यासमोर भस्मसात झाल्या
Crime News: याप्रकरणी दौलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Crime News छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या माळीवाडामध्ये एसबीआय बँकेचे एटीएम गॅस कटरने फोडल्याची (Crime) घटना समोर आली आहे. दोन चोरट्यांनी गॅस कटरने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्यामुळे एटीएमला आग लागून जवळपास 13 ते 15 लाख जळून खाक झाल्या. ही घटना सोमवारी पहाटे 4.15 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौलताबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
सोमवारी पहाटे 4.15 वाजेच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये तीन ते चार अज्ञात चोरटे आले. त्यांनी त्यांची कार बँकेसमोर उभी करून तोंडाला कपडा बांधलेल्या दोन व्यक्तींनी एटीएममध्ये प्रवेश करून शटर बंद केले. त्यानंतर त्यातील एका व्यक्तीने एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला व सोबत आणलेल्या गॅस कटरच्या साह्याने एटीएम मशिन कापणे सुरू केले.
गॅस कटरची ठिणगी पडली अन्...
मशिनचा समोरचा भाग कापला गेला. परंतु एटीएम मशिनचा आतील भाग तसाच असल्याने गॅस कटरची नळी फिरली आणि त्यात गॅस कटरची ठिणगी पडली. त्यामुळे एटीएममधील जवळपास 13 ते 15 लाख रुपयांची रक्कम जळून खाक झाली. यानंतर बाजूला राहणाऱ्या नागरिकांनी याबाबत पोलिसांनी माहिती दिली. काही वेळात तेथील सायरन वाजायला सुरुवात झाली. त्यामुळे बँकेच्या आसपास राहणारे काही ग्रामस्थ घराबाहेर निघाले. ही बाब चोरट्यांच्या लक्षात येताच त्यांनी गॅस कटर मशिन व अन्य साहित्य तेथेच टाकन पळ काढला.
सीसीटीव्ही फुटेज जप्त-
चोरट्यांनी एटीएममधील एक सीसीटीव्ही कॅमेरा तोडला तो बंद होता. त्याच्या बाजूला दुसरा डिजिटल कॅमेरा होता, त्या कॅमेऱ्यात ही घटना चित्रीत झाली आहे. पोलिस तपासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
धाक दाखवून दरोडा, चाळीस लाखांचे दागिने लंपास-
कुठल्याही आरोपीची कायद्याच्या चौकटीतून सुटका नसते. आरोपीने केलेल्या कृत्याचे पितळ कधी ना कधी उघड होतच असतं. अशाच एका गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांनी यश आले आहे. मात्र, या गुन्ह्यातील आरोपीला (Crime) पकडण्यास पोलिसांना तब्बल 17 वर्ष लागली आहे. ही घटना आहे मुंबईतील मीरा रोड आणि नालासोपारा इथल्या ज्वेलर्सच्या दुकानातील चोरीची. 17 वर्षापूर्वी नालासोपारा येथील ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन पाच जणांच्या टोळीने चॉपरचा धाक दाखवून दरोडा टाकला होता. यात त्यांनी तब्बल चाळीस लाखांचे दागिने लंपास केले होते. त्यानंतर यातील आरोपीने तब्बल 17 वर्ष पोलिसांना गुंगारा देत पळ ठोकला होता. अखेर पोलिसांनी यातील मुख्य आरोपीला हिंगोली येथील भांडेगाव येथून अटक केली आहे.