Sambhaji Nagar News : आधी औरंगजेबाचे पोस्टर, आता नवरदेव अन् बिर्याणीची दावत; नामांतराच्या विरोधातील उपोषणाची अशीही चर्चा
Chhatrapati Sambhajinagar : औरंगजेबाचे पोस्टर झळकल्याने या उपोषणाची राज्यभर चर्चा झाली.
Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्यावतीने हे उपोषण करण्यात येत आहे. तर या उपोषणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील पाठिंबा दिला आहे. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. परंतु पहिल्या दिवसापासून हा उपोषण कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेचा विषय ठरत आहे. आधी औरंगजेबाचे पोस्टर झळकल्याने या उपोषणाची राज्यभर चर्चा झाली. त्यातच आता उपोषणाला एका नवरदेवाने पाठिंबा दिला. असे असतानाच उपोषणास्थळी बिर्याणीच्या जेवणाच्या पंगती उठवल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तीन दिवसांत नेमकं काय घडलं!
औरंगजेबाचे पोस्टर झळकले: दरम्यान पहिल्या दिवशी शनिवारी (4 फेब्रुवारी) छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर दुपारी 1 वाजेच्या सुमारास साखळी उपोषणाला सुरवात झाली. दरम्यान काही तासांनी उपोषणास्थळी एक तरूण हातात औरंगजेबाचे पोस्टर घेऊन आला. त्यानंतर जोरदार घोषणाबाजी करत तरुणांनी जल्लोष केला. तर या प्रकरणी शहरातील सिटी चौक पोलिसात अज्ञात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
नवरदेवाचा व्हिडिओ व्हायरल: नामांतराच्या निर्णयाच्या विरोधात शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला अनेक छोट्या-मोठ्या संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. असे असताना दुसऱ्या दिवशी याच उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आलेला एक नवरदेव चर्चेचा विषय ठरला. मंडपात लग्न लागताच या नवरदेवाने थेट उपोषणस्थळ गाठले आणि औरंगाबाद नावाला समर्थन देत, आपला उपोषणाला पाठिंबा असल्याचं सांगितले.या नवरदेवाचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, त्याच्या याच कृतीची सर्वत्र चर्चा होत आहे.
उपोषणास्थळी बिर्याणीच्या पंगती: पहिले दोन दिवस वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आलेला नामांतराविरोधातील उपोषण आता आणखी एक नवीन आरोपाने चर्चेत आला आहे. कारण याच साखळी उपोषणात काल जेवणाच्या पंगती उठवल्या गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. उपोषणस्थळी बिर्याणीची दावत देण्यात आली. त्यामुळे उपोषणस्थळी जेवणाच्या पंगती उठवल्या जात असतील तर त्याला उपोषण म्हणायचं का? असा प्रश्न शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे. शिवाय उपोषणस्थळी सीसीटीव्ही बसवण्याची मागणी देखील जंजाळ यांनी केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Chhatrapati Sambhajinagar: अन् नवरदेव थेट नामांतराच्या विरोधातील उपोषणास्थळी पोहचला, व्हिडिओ व्हायरल