Chhatrapati Sambhajinagar: अन् नवरदेव थेट नामांतराच्या विरोधातील उपोषणास्थळी पोहचला, व्हिडिओ व्हायरल
Chhatrapati Sambhaji Nagar: लग्नाचे कपडे घालून आलेल्या या नवरदेवाला उपोषणस्थळी पाहून चर्चेचा विषय बनला होता.
Chhatrapati Sambhajinagar: औरंगाबादच्या (Aurangabad) नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यात साखळी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. दरम्यान उपोषणाला मोठी गर्दी देखील होताना पाहायला मिळत आहे. मात्र असं असतानाच एका नवरदेवाने लग्न लागल्यानंतर थेट उपोषणाच्या ठिकाणी जाऊन पाठिंबा दिला. लग्नाचे कपडे घालून आलेल्या या नवरदेवाला उपोषणस्थळी पाहून चर्चेचा विषय बनला होता.
औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकराने घेतला आहे. दरम्यान याच निर्णयाच्या विरोधात छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणाला अनेक छोट्या-मोठ्या संघटनांनी पाठींबा दर्शवला आहे. असे असताना याच उपोषणाला पाठींबा देण्यासाठी आलेला एक नवरदेव चर्चेचा विषय ठरला आहे. लग्न लागताच या नवरदेवाने थेट उपोषणस्थळ गाठले. तसेच औरंगाबाद नावाला समर्थन देत, आपला उपोषणाला पाठींबा असल्याचं सांगितले. त्यामुळे या नवरदेवाच्या कृतीचं सर्वत्र चर्चा होत आहे.
व्हायरल व्हिडीओ
उपोषणाचा तिसरा दिवस!
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आल्याने या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर साखळी उपोषण करण्यात येत आहे. दरम्यान या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीकडून हे उपोषण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच उपोषणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील पाठींबा दिला आहे. तर गेल्या तीन दिवसांपासून जलील उपोषणास्थळी हजेरी लावताना देखील पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या उपोषणाला तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तर वेगवेगळ्या संघटनांनी पाठींबा देत या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आहे.
राजकीय वातावरण तापणार...
नामांतराच्या विरोधात उपोषण केले जात असतानाच, याच उपोषणाला देखील विरोध होताना पाहायला मिळत आहे. मनसे, शिवसेना (शिंदे गट), सकल हिंदू एकत्रिकरन समिती, मराठा क्रांती मोर्च्याचे समन्वयक आणि भाजपकडून उपोषणाला विरोध करण्यात आला आहे. तर भाजपकडून या विरोधात निदर्शने करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नामांतराच्या मुद्यावरून पुढील काळात राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. तसेच आगामी निवडणुकीत देखील नामांतराचा मुद्दा केंद्रबिंदू असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे याच मुद्यावरून महानगरपालिका निवडणुका राजकीय पक्षांनी लढवल्या आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: