Corona Update: संभाजीनगरकरांची चिंता वाढली, जिल्ह्यात दोन दिवसांत 31 कोरोनाच रुग्ण वाढले
Chhatrapati Sambhaji Nagar : बुधवारी देखील जिल्ह्यात एकूण 12 नवे रुग्ण आढळले असून, ज्यात शहरात 10 तर ग्रामीणमध्ये 2 रुग्णांचा समावेश आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Corona Update: साधारण गेल्या साडेतीन वर्षापासून संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या महामारीचा (Corona virus) सामना करताना पाहायला मिळत आहे. अशात आता पुन्हा एकदा कोरोना देशात डोकं वर काढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान राज्यात देखील अशीच काही परिस्थिती पाहायला मिळत आहे. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात (Chhatrapati Sambhaji Nagar District) सुद्धा चिंता वाढवणारे कोरोनाचे आकडे समोर येत आहे. कारण मंगळवारी जिल्ह्यात कोरोनाचे नवे 19 रुग्ण आढळून आले असताना, दुसऱ्या दिवशी बुधवारी देखील जिल्ह्यात एकूण 12 नवे रुग्ण आढळले आहे. ज्यात शहरात 10 तर ग्रामीणमध्ये 2 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांत एकूण 31 नवे रुग्ण वाढले आहेत. तसेच सध्या जिल्ह्यात 58 रुग्ण सक्रिय आहेत. ज्यापैकी 5 जण हॉस्पिटलमध्ये तर, उर्वरित 53 जण घरीच उपचार घेत आहेत.
मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले. तर दररोज जिल्ह्यात नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू आहे. मागील दोन दिवसांत जिल्ह्यात 31 नवे रुग्ण वाढले आहेत. मंगळवारी शहर व ग्रामीण मिळून 19 रुग्ण आढळले होते. तसेच बुधवारी जिल्ह्यात नव्याने 12 रुग्णांची भर पडली. दिवसभरात उपचाराअंती बरे झालेल्या शहरातील 8 जणांची सुटी झाली. त्यामुळे सद्या जिल्ह्यात 58 रुग्ण सक्रिय आहेत. ज्यात सध्या शहरात 45 सक्रिय रुग्ण असून, यांपैकी 5 रुग्ण हॉस्पिटलमध्ये तर, 40 जण घरीच उपचार घेत आहेत. ग्रामीणमधील 13 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात आता मास्कसक्ती
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येनंतर आता सरकारला जाग आली आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयात आता मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर मास्क लावूनच रुग्णालयात काम करण्याच्या सूचना सरकारकडून आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे यापुढे आता शासकीय रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका यांच्यासह सर्वच कर्मचाऱ्यांना मास्क लावण्याचे आदेश देण्यात आले आहे. वाढत्या कोरोना रुग्ण संख्या पाहता सरकराने हा निर्णय घेतला असल्याचे समोर आले आहे.
काळजी घेण्याचे आवाहन...
दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने, महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणासह जिल्हा आरोग्य विभाग देखील अलर्ट झालं आहे. तर कोरोना चाचण्या देखील वाढवण्यात आल्या आहेत. महानगरपालिका हद्दीत प्रत्येक आरोग्य केंद्रात कोरोना चाचणी करण्यात येत आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना लक्षणे जाणवत असल्यास त्यांची देखील चाचणी केली जात आहे. सोबतच नागरिकांनी देखील काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
CoronaVirus in India : कधी संपणार कोरोनाचा संसर्ग, ICMR चे डॉक्टर म्हणतात....