एक्स्प्लोर

दहा वर्षांनी झालेल्या बाळाचं बारसं करून पुण्याला निघाले, मद्यधुंद तरुणांच्या स्कॉर्पिओनं उडवलं, संभाजीनगरमधील मन सुन्न करणारी घटना

Chhatrapati Sambhajinagar Drunk & drive : दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली.

छत्रपती संभाजीनगर : ड्रंक अँड ड्राईव्हच्या (Drunk and Drive) घटनेने छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) हादरले आहे. दहा वर्षानंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून पुण्याला (Pune) जाणाऱ्या कुटुंबाच्या कारला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात (Accident) चौघांचा दुदैवी मृत्यू झाला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावती येथील अजय देसरकर हे अभियंते कुटुंबासह पुण्याला जात असताना दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या तरुणांच्या स्कॉर्पिओने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. संभाजीनगर शहरापासून जवळच असलेल्या नगर रोडवरील लिंबे जळगाव परिसरातील टोलनाक्याजवळ ही घटना घडली. दहा वर्षांनंतर झालेल्या बाळाचे बारसे आटोपून कुटुंब पुण्याकडे जात असताना ही हृदयद्रावक घटना घडली. धक्कादायक म्हणजे दारू पिऊन स्कॉर्पिओ चालवणारे दोन मुलं दुभाजकांना ओलांडून पलीकडे जाऊन कारला धडकले.

चौघांचा मृत्यू, दोन जखमी 

या अपघातात मृणालिनी अजय बेसरकर (38), आशालता हरिहर पोपळघट (65), अमोघ बेसरकर (सहा महिने), दुर्गा सागर गीते (7) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अजय अंबादास बेसरकर (40), शुभांगिनी सागर गीते (35) या जखमी झाल्या आहेत. विशाल चव्हाण नावाच्या ड्रायव्हरने कृष्णा केरे याला गाडी चालवायचं लायसन नसताना गाडी चालवण्यास दिली. कृष्णा केरे हा दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी दारू पिऊन गाडी चालवत अपघाताला कारणीभूत ठरलेल्या दोन जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

आणखी वाचा  

Ganapati Visarjan 2024 : मावळमध्ये गणपतीचे विसर्जन करायला गेलेले बाप-लेक बुडाले, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर

Nashik Accident News : नगर-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, कारचा अक्षरशः चक्काचूर, पत्रा कापून दोघांचे मृतदेह काढले बाहेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaAkhil Chitre Join UBT Shivsena | मनसेच्या अखिल चित्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आदित्य ठाकरे म्हणाले....Uddhav Thackeray Speech Daryapur| आम्ही तिघे भाऊ सगळा महाराष्ट्र खाऊ; ठाकरेंची महायुतीवर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Embed widget