एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : संभाजीनगर हादरलं! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी, अल्पवयीन मुलीवर 6 जणांचा अत्याचार

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये 15 वर्षांच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत तिच्यावर सहा जणांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) शहरात मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका 15 वर्षांच्या मुलीचा अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करत तिच्यावर 6 जणांनी आळीपाळीने अत्याचार (Gangrape) केला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरु होता. या घटनेने संभाजीनगर शहर हादरुन गेलं आहे. तर या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात एकूण सहा जणांविरोधात विधिसंघर्षग्रस्त बालकावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक तसेच आयटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अक्षय चव्हाण असे मुख्य आरोपीचे नाव आहे.

ब्लॅकमेल करुन वारंवार अत्यचार

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीवर सुरुवातीला ओळखीच्या अक्षय चव्हाण नावाच्या मित्राने अत्याचार केला. अत्याचार करतानाचा व्हिडीओ देखील बनवला. पुढे पीडित मुलीला तोच व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल केलं. धक्कादायक म्हणजे त्याच्या अन्य सहा ते सात मित्रांना या पाशवी कृत्यात सहभागी केले. या आरोपींकडून मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. तसेच तिने नकार दिल्यास तिला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात येत होती. दरम्यान सततच्या या अत्याचाराला कंटाळून मुलीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी ती रेल्वे स्थानकावर सुद्धा पोहोचली. पण तिला एकटे पाहून, तिच्या हालचालीवरुन पोलिसांना संशय आला आणि हा सर्व प्रकार समोर आला.

आरोपीच्या मित्रांचा देखील मुलीवर अत्याचार

अल्पवयीन पीडित मुलगी सध्या नववीच्या वर्गात शिकते. 2022 मध्ये ती अक्षय चव्हाणच्या संपर्कात आली. मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्यानंतर त्यांचे नियमित व्हॉट्सअॅपवर बोलणे सुरु झाले. मात्र, या तरुणाने त्यानंतर तिला भेटण्यासाठी हट्ट सुरु केला. त्याने विश्वास जिंकत तिला भेटण्यासाठी गळ घातली. त्यानंतर पहिल्यांदा ऑक्टोबर महिन्यात भेटायला बोलावून तिच्यावर अत्याचार केला. अत्याचाराचे चोरुन मोबाईलमध्ये चित्रणदेखील केले. पुढे हाच व्हिडीओ दाखवून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला. तसेच आपल्या मित्रांना देखील मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली.

यामुळे सर्व प्रकरण समोर आले!

चौदा वर्षीय मुलीवर अक्षयने सातत्याने अत्याचार केला. अक्षयने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत मित्रांकडूनही तिच्यावर अत्याचार केले. एक-दोन नाही, तर तब्बल सहा मित्रांनी तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. सातत्याने विविध ठिकाणी नेत ब्लॅकमेल करत अत्याचार करुन निर्दयीपणे छायाचित्रण करत गेले. मित्राकडून सुरु झालेल्या अत्याचाराबाबत कोणाला सांगायचे, कोणाकडे व्यक्त व्हायचे हा प्रश्न मुलीसमोर होता. यातच तिला पुन्हा एका मित्राने तिच्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचे ठरवत सोबत पळून जाण्याचे आश्वासन दिले. तणावाखाली गेलेल्या मुलीचा त्याच्यावर विश्वास बसला. त्याच्या सांगण्यावरुन 18 मे रोजी तिने घरातील वीस हजार रोख, सोन्याचे दागिने, वडिलांचा मोबाईल फोन घेऊन पोबारा केला. रात्री बारा वाजता एकटी रेल्वे स्थानकावर मित्राची वाट पाहत उभी होती. मित्र मात्र आलाच नाही. स्थानकावरील एका पाणी विक्रेत्याला हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने रेल्वे पोलिसांना कळवले. रेल्वे पोलिसांनी शहर पोलिसांना कळवले. दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक अनिता फसाटे यांनी पथकासह धाव घेत तिला ताब्यात घेतले. त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.

हेही वाचा

Chhatrapati Sambhaji Nagar Crime : पती-पत्नी चालवायचे लॉजमध्ये कुंटणखाना, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला अन् भांडाफोड झाला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas : संतोष देशमुख हत्येचा तपास आणि  गृहमंत्र्यांचं सहकार्य; सुरेश धस नेमकं काय म्हणाले....ABP Majha Headlines : 07 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBajrang Sonawane On Santosh Deshmukh Case : हत्येच्या तपासावर समाधानी नाही : बजरंग सोनवणेTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर  : 04 February 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
42 महागडे मोबाईल हस्तगत, रेल्वे स्थानकावरील चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; परराज्यातील टोळीचा पर्दाफाश
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
अपहरणानंतर 24 तासांनी पोरगं घरी परतलं; औक्षण होताच आईला बिलगलं, ढसाढसा रडलं
Raigad : रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
रेशनिंग घेताय मग ई-केवायसी अपडेट केलीय का? 'या' तारखेनंतर रेशन धान्य बंद 
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत शिंदेंच्या मंत्र्यांची उघडपणे भूमिका; जितेंद्र आव्हाडांकडून अभिनंदन
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
आगामी काळातील निवडणुका युद्ध,आतापासूनच युद्ध सामग्री गोळा करा; एकनाथ खडसे असं का म्हणाले?
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
राहुल सोलापूरकरला गोळ्या घाला, उदयनराजे आक्रमक; सुरेश धस म्हणाले, कवट्या महंकाळ जिथं दिसल तिथं हाणा
Buldhana Hair Loss : केस गळती प्रकरण, ICMR पथक पुन्हा शेगावात, रुग्णाचे पु्न्हा रक्ताचे नमुने घेतले, नागरिकांमध्ये संभ्रम
केस गळती प्रकरण, ICMR पथक पुन्हा शेगावात, रुग्णाचे पु्न्हा रक्ताचे नमुने घेतले, नागरिकांमध्ये संभ्रम
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंचाही हायकोर्टात अर्ज; याचिकाकर्त्यांना 2 आठवड्यांची मुदत
Embed widget