एक्स्प्लोर

मोठी बातमी! छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात; मविआला मोठा धक्का

APMC Election 2023 Result : विशेष म्हणजे या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.  

APMC Election 2023 Result : राज्यभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती येत असून, काही ठिकाणी अंतिम निकाल स्पष्ट झाले आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर  (Chhatrapati Sambhaji Nagar) बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीला मोठं धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 11 जागा भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त 4 जागांवर विजय मिळवता आला आहे. तर उरलेल्या तीन जागांवर इतर अपक्ष यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.  

छत्रपती संभाजीनगर बाजारसमिती माहिती 

  • छत्रपती संभाजीनगर बाजार समिती भुसार मालासाठी ओळखली जाते.(गहू, डाळिंब,)
  • छत्रपती संभाजीनगर वार्षिक उलाढाल: 3 कोटी 87 लाख.
  • छत्रपती संभाजीनगर या बाजार समितीत एवढे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजप आमदार हरिभाऊ नाना बागडे विरुद्ध काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे अशी लढत होणार आहे.
  • गेल्यावेळी देखील बाजार समिती भाजपच्याच ताब्यात होती. 

छत्रपती संभाजीनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपा शिवसेना पुरस्कृत पॅनलला स्पष्ट बहुमत 15 पैकी 11 जागेवर विजयी

विजयी उमेदवार

1) राधाकिसन देवराव पठाडे
2) श्रीराम भाऊसाहेब शेळके
3) गणेश सांडू दहीहंडे 
4) भागचंद रुस्तुम ठोंबरे
5) अभिजीत भास्कर देशमुख
6) मुरलीधर पुंडलिक चौधरी
7) सुजाता मनोज गायके
8) जनाबाई ज्ञानेश्वर ठोंबरे
9) दत्ताभाऊ पांडुरंग ऊकर्डे 
10) भागिनाथ रणुबा नवपुते
11) पूनमचंद सोनाजी बमणे 

तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे 4 उमेदवार विजयी

1) जगन्नाथ वैजनाथ काळे
2) कैलास ज्ञानदेव ऊकर्डे
3) महेंद्र जनार्दन खोतकर
4) पठाण अब्दुल रहीम अब्दुल सलाम        

एकूण 98.61 टक्के मतदान

जिल्ह्यात अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. यावेळी झालेल्या मतदान प्रक्रियेत सोसायटी मतदार संघात 935 पैकी 925 मतदारांनी मतदान केले होते. तर ग्रामपंचायत मतदार संघातून 1068 पैकी 1068 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.  त्यामुळे एकूण आकडेवारी पाहिली तर सोसायटी व ग्रामपंचायतच्या एकूण 2021 मतांपैकी 1993 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होतं. तर एकूण 98.61 टक्के मतदान झाले होते. विशेष म्हणजे या बाजार समितीत सत्ता आपल्या ताब्यात घेण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे, भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे तसेच माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र अखेर भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारत महाविकास आघाडीचा पराभव केला आहे. 

भाजप-शिंदे गटाचे वर्चस्व...

मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक मोठी बाजार समिती समजल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर बाजार समिती आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. विशेष म्हणजे भाजप आमदार हरिभाऊ बागडे आणि शिंदे गटाचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी यासाठी विशेष लक्ष घातले होते. तर मतदानाच्या दिवशी दोन्ही नेते मतदान केंद्राबाहेर तळ ठोकून बसले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या:

Crime News : संतापजनक! दारूच्या नशेत निर्दयी बापाने पोटच्या लेकांना विहिरीत फेकले; एकाचा मृत्यू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 16  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारतRajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget