एक्स्प्लोर

Crime News : संतापजनक! दारूच्या नशेत निर्दयी बापाने पोटच्या लेकांना विहिरीत फेकले; एकाचा मृत्यू

Chhatrapati Sambhaji Nagar News : घरापासून 200 मीटरवर असलेल्या एका विहिरीकडे दोन्ही मुलांना घेऊन गेला आणि दोन्ही मुलांना विहिरीत फेकून देऊन घरी परत आला. 

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एक संतापजनक घटना समोर आली आहे. दारूच्या नशेत निर्दयी बापाने आपल्या दोन मुलांना विहिरीत फेकून दिले. यात एका मुलाला वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले असून, एकाचा मात्र पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.  तर श्रेयस राजू भोसले (वय 7 वर्षे) असे मृत मुलाचे तर शिवम राजू भोसले (वय 9 वर्षे) असे बचावलेल्या मुलाचे नाव आहे. तसेच राजू प्रकाश भोसले (वय 33 वर्षे)  असे निर्दयी बापाचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजू भोसले हा शहरातील चौधरी कॉलनीत आई, वडील व दोन मुलांसह राहतो. तर चिकलठाणा भागात वेल्डींगची कामे करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितो. मात्र राजूला दारूचे व्यसन लागले. रोज दारू पिऊन घरी येत असल्याने त्याचे पत्नीसोबत वाद होऊ लागला.  मात्र रोजच्या या त्रासाला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी राजूची पत्नी माहेरी निघून गेली होती. मात्र माहेरी जाताना दोन्ही मुलं राजूकडेच सोडून गेली. त्यामुळे राजूच मुलांचा सांभाळ करीत होता. मात्र शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तो पुन्हा दारू पिऊन घरी आला. त्यानंतर घरापासून 200 मीटरवर असलेल्या एका विहिरीकडे दोन्ही मुलांना घेऊन गेला आणि दोन्ही मुलांना विहिरीत फेकून देऊन घरी परत आला. 

राजूने शुक्रवारी रात्री दारूच्या नशेत टोकाचे पाऊल उचलत आपल्या नऊ आणि सात वर्षांच्या दोन मुलांना सोबत घेऊन घरापासून जवळच असलेल्या विहिरीत ढकलून दिले. यात सात वर्षीय श्रेयस राजू भोसले याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर शिवम राजू भोसले याला वाचविण्यात स्थानिकांना यश आले. चिकलठाण्यातील चौधरी कॉलनीत शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान एका मुलाला बाहेर काढल्यावर दुसरा मुलगा मात्र सापडत नव्हता. त्यामुळे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर करण्यात आलेल्या शोध कार्यानंतर पाण्यात बुडालेल्या मुलाला बाहेर काढण्यात यश आले, पण त्याचा मृत्यू झाला होतं. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

तरुणामुळे वाचला जीव...

दारूच्या नशेत असलेल्या राजू भोसलेने दोन्ही मुलांना विहिरीत ढकलून तेथून निघून गेला. दरम्यान विहिरीतून मुलांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. त्यामुळे तेथेच राहणाऱ्या अनिरुद्ध दहिहंडे या तरुणाने मुलांचं आवाज आल्याने त्याने तत्काळ विहिरीकडे धाव घेतली. पुढे त्याने कसलाही विचार न करता थेट विहिरीत उडी मारली. त्यामुळे 9 वर्षीय शिवमला वाचविण्यात त्याला यश मिळाले. पण, श्रेयसचा त्याला शोध घेता आला नाही आणि दुर्दैवाने त्याचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळीचा हाहाकार! 10 जणांचा बळी, 1178 कोंबड्या दगावल्या; पीक-फळबागांना फटका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

MVA On MNS : मनसेविना मविआला मुंबईत बहुमत मिळवणं कठीण? मतांचं इक्वेशन संपवणार टशन? Special Report
Ayodhya Dhwaj :पंतप्रधान मोदी, सरसंघचालकांच्या हस्ते ध्वजरोहण  राममंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाचा साज
Special Report Highly Gubbi : हायली गुब्बी ज्वालामुखीचा अचानक स्फोट, इथोपियात ज्वालामुखी भारतात स्फोट
Kunal Kamra Special Report : कुणाल कामराच्या पोस्टवरून वाद  टीशर्टवरील फोटोवरून भाजप नेत्यांची टीका
Maharashtra Politics : निवडणूक आली,दोस्तीतली 'दुश्मनी' दिसली;नेत्यांमधील वाद शिगेला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka : कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली, डीके शिवकुमार अन् मल्लिकार्जुन खर्गे एकाच कारमधून प्रवास
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
रेल्वेचे अधिकारी मस्तवालपणे स्वतःच्या कार्यालयात बसून राहतात, प्रवाशांना सुविधा नाहीत; खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे तक्रार
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
ह्रदयद्रावक... लग्नानंतर अर्ध्या तासाच नवरदेव कोसळला, ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; लग्नमांडवात शोककळा
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
मोठी बातमी! मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; यादी जाहीर, कोणत्या वार्डात सर्वाधिक?
T 20 World cup 2026: मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
मोठी बातमी! टी-20 विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; 10 वर्षानंतर मायदेशात, भारत-पाकिस्तान सामना कधी?
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
नगरपालिका निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडेल; 'सर्वोच्च' सुनावणीनंतर काय म्हणाले CM फडणवीस
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
आठवड्यापूर्वी लग्न, देवदर्शनासाठी निघाले अन् लोणावळा स्टेशनवर तोल गेला; RPF पोलिसामुळे तरुण बचावला
Embed widget