(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : 7 प्रतिष्ठानांकडून 60 हजारांचा दंड वसूल, मनपाच्या उपद्रव शोध पथकाची कारवाई
मनपाच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात धडक कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय रस्त्यालगत बांधकाम साहित्य ठेवणाऱ्या बिल्डर्सवरही कारवाई करुन दंड वसूल करण्यात येत आहे.
नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवारी 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ, सतरंजीपूरा आणि आशिनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली.
धरमपेठ झोन अंतर्गत डब्ल्यू.एच.सी.रोड, गोकुलपेठ येथील मधुराज (हल्दीराम) रेस्टॉरेंट या रेस्टॉरेंट विरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपूरा झोन अंतर्गत राणी दुर्गावती चौक येथील तुषार सनकाळे यांच्याविरूध्द प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला. आशिनगर झोन अंतर्गत दीक्षीत नगर, नारी रोड येथील सोनु रेस्टॉरेंट या रेस्टॉरेंट विरूध्द प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसुल केला.
4 बिल्डरकडून 40 हजारांचा दंड वसूल
त्याचप्रमाणे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत सुरेन्द्रनगर येथील CEOn Builders & Developers यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. धरमपेठ झोन अंतर्गत वेलकम सोसायटी, दाभा येथील Kothari Builders यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. नेहरुनगर झोन अंतर्गत सुर्वे नगर, वाठोडा येथील Takeoff Infira Pvt Ltd यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच आशिनगर झोन अंतर्गत दिपक नगर, नारी रोड येथील Ansari Constructions यांच्याविरुध्द सुध्दा रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरवून ठेवल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसुल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
इतर महत्वाच्या बातम्या