Buldhana Rain : ABP माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट, संपर्क तुटलेल्या काळेगावात बोटीच्या सहाय्याने आरोग्य पथक दाखल
आजारी असलेल्या लहान बाळाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आईला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागला होता. या घटनेचे वृत्त ABP माझान प्रसिद्ध केलं होतं. याची प्रशासनानं दखल घेतली आहे.
Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आजारी असलेल्या लहान बाळाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आईला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास केल्याचा हा व्हिडिओ आहे. याबाबचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. त्यानंतर लगेच प्रशासनानं ABP माझाच्या वृत्ताची दखल घेतली आहे. मलकापूर तालुक्यातील पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे चार दिवसांपासून संपर्क तुटलेल्या काळेगावात बोटीच्या सहाय्याने तत्काळ आरोग्य पथक रवाना करण्यात आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुलं अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आला आहे. पुराच्या पाण्यामुळं गेल्या चार दिवसांपासून काळेगावचा संपर्क तुटला आहे. या गावात अतिवृष्टीमुळं अनेक वृद्ध आणि लहान मुले आजारी असल्याची भीती आहे. दरम्यान, एका लहान आजारी मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी आईनं पुराच्या पाण्यातून टायरवर बसून जीवघेणा प्रवास केला होता. याबाबतची बातमी ABP माझाने दाखवली होती. तत्काळ या प्रकरणाची प्रशासनानं दखल घेतली आहे. अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी तत्काळ आरोग्य आणि महसूल प्रशासनाला आदेश दिले आहेत. प्रशासनाने आरोग्य पथक रवाना केलं आहे. बोटीच्या सहाय्यानं हे पथक गावात पोहोचलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे लगतच्या छोट्या नदी पात्रात पुराचं बॅक वॉटर घुसल्यानं पूर्णा काठच्या गावाना पूर परिस्थिचा सामना करावा लागत आहे. पूर्णा नदीच्या पाण्यामुळं काळेगाव येथील विश्वगंगा नदीला पूर आला आहे. गेल्या तीन दिवसापासून काळेगावचा संपर्क तुटला आहे. या गावातील एका लहान बाळाला खूप ताप आला होता. यावेळी बाळाला त्याच्या आईसह मलकापूर येथील रुग्णालयात जाण्यासाठी टायरवर बसवून 12 फूट पाण्यातून जीवघेणा प्रवास करत नदी पार करावी लागली होती. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा घटनेबाबत ABP माझाने वृत्त प्रसिद्ध केलं होतं. प्रशासनानं त्याची दखल घेत आरोग्य पथक काळेगावत दाखल केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- Buldhana Rain : आजारी तान्हुल्याला घेऊन आईचा नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास, बुलढाण्यातील व्हिडीओ समोर
- Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून, त्र्यंबकच्या शेंद्रीपाड्यात उभारला होता पूल