एक्स्प्लोर

Buldhana Rain : आजारी तान्हुल्याला घेऊन आईचा नदीच्या पुरातून जीवघेणा प्रवास, बुलढाण्यातील व्हिडीओ समोर

बुलढाणा जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा एक बोलका व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आजारी असलेल्या लहान बाळाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी आईला पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागलाय.

Buldhana Rain : बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पावसानं धुमकूळ घातला आहे. या पावसामुळं अनेक ठिकाणी जनजजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूर परिस्थितीचा एक बोलका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पूर्णा नदीच्या पाण्यामुळं मलकापूर तालुक्यातील काळेगाव येथील विश्वगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळं गेल्या तीन दिवसापासून काळेगावचा संपर्क तुटला आहे. या गावातील एका लहान बाळाला खूप ताप आला होता. यावेळी बाळाला त्याच्या आईसह मलकापूर येथील रुग्णालयात जाण्यासाठी टायरवर बसवून 12 फूट पाण्यातून जीवघेणा प्रवास करत नदी पार करावी लागली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

बुलढाणा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे लगतच्या छोट्या नदी पात्रात पुराचं बॅक वॉटर  घुसल्यानं पूर्णा काठच्या गावाना पूर परिस्थिचा सामना करावा लागत आहे. पूर्णा नदीच्या पाण्यामुळं काळेगाव येथील विश्वगंगा नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यातून एका आजारी पडलेल्या लहान बाळाला घेऊन आईनं 12 फूट पाण्यातून प्रवास केला आहे. या गावात पोहोचण्यासाठी आम्ही युद्ध स्तरावर प्रयत्न  करत आहोत. याठिकाणी आताच एक बोट लावण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांनी दिली आहे. अनेक रुग्ण या गावात अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे.
 
शेतीचंही मोठं नुकसान 

बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानं पूर्णा नदीला पूर आला आहे. या पुरामुळं अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीला मिळालं आहे. अनेकांनी कर्ज काढून पेरणी केली होती. पीक चांगलं उगवलं होती. मात्र पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे सगळंच हिरावून घेतलं आहे. बुलढाण्यातील देऊळगाव पातुर्डा परिसरातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्यानं आता शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे. पुराचं सर्व पाणी नदीकाठच्या परिसरात असलेल्या शेतीतशिरलं असल्यानं, यामुळं परिसरातील हजारो हेक्टर सोयाबीन, कापूस, तूर अशी पीक पाण्याखाली गेली आहेत. पूर्णा नदीकाठी असलेल्या सर्व शेतात हीच परिस्थिती आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखतDilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रियाMahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुनPrakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget