एक्स्प्लोर

Buldhana News : बुलढाण्यात शिवसेनेत तुफान राडा, ठाकरे-शिंदे गट भिडले, पोलिसांसमोरच धक्काबुक्की

Buldhana News Update : शिवसेनेच्या (Shiv sena) कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Buldhana News Update : बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या (Shiv sena) कार्यक्रमात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी तुफान गोंधळ घातला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा येथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आल्यानं कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. कार्यकर्ते पोलिसांसमोरच भिडल्याने काही काळ तणावाचे वातापरण निर्माण झाले होते. 

बुलढाणा कुषी उत्पन बाजार समिती (Buldhana Krushi Utpanna Bazar Samiti) येथे शिवसेनेच्या (Shiv Sena) सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या कार्यक्रमात  शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांचा पुत्र आणि कार्यकर्त्यांनी तुफान राडा केला. शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम सुरू असताना अचानक आमदार गायकवाड यांचे कार्यकर्ते तेथे आल्याने दोन्ही गट आमोरासमोर भिडले.  

लाठीचार्ज 
शिवसेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा इथे सत्कार समारंभ सुरू होता. त्यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र आणि कार्यकर्ते इथं आले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते अचानक पुढे आल्यानं कार्यकर्तेही एकमेकांना भिडले. त्यानंतर परिस्थिती निवळण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या वातावर शांत आहे. 

दरम्यान, आजपर्यंत दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका केली जात होती. परंतु, आता हा संघर्ष शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. बुलढाणा बाजार समितीत पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात शिंदेगटातील कार्यकर्त्यांनी धुडगूस घातला. यावेळी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे दोन्ही गटातील कार्यकर्ते समोरासमोर आले. 

खुर्च्यांची तोडफोड

दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडल्याने जवळपास 15मिनिटे हा राडा सुरू होता. यावेळी खुर्च्यांची फेकाफेक करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. कार्यक्रमातील काही खुर्च्या देखील तुटल्या आहेत. परंतु, यावेळी पोलिसांनी फक्त बघ्यांची भूमिका घेतल्याचा आरोप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या राड्यामुळे बुलढण्यात तणाव वाढला असून शहराला छावणीचं स्वरूप प्राप्त झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या

Dada Bhuse : दादा भुसेंचे उदघाटन सुरु असताना '50 खोके एकदम ओके' च्या घोषणा, शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे 

Ajit Dobal Mumbai Visit : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल मुंबईत; बैठकांचं मॅरेथॉन सत्र, काही महत्त्वाच्या गाठीभेटी 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Health Update : सिंहासारखा लढला अन् बाहेर आला,डॉक्टरांनी दिली सैफची A टू Z माहितीSaif Ali Khan Health Update| सैफ अली खानला आज ICU मधून खासगी वॉर्डात शिफ्ट करणारSaif Ali khan Attracker: सैफचा हल्लेखोर वांद्रे स्टेशनच्या CCTV मध्ये कैद, घटनेनंतर वसई-विरारला रवानाSomnath Suryawanshi Parbhani : सोमनाथ सुर्यवंशींच्या कुटुंबियांनी दुसऱ्यांदा नाकारली शासकीय मदत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Imran Khan : माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
माजी पीएम इम्रान खान यांना 14 वर्ष जेलची शिक्षा; 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप
EPFO : पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
पीएफ खातेदारांना ईपीएफओकडून गुड न्यूज, प्रॉविडंट फंड ट्रान्सफर करणं झालं सोपं, प्रक्रिया कशी असणार?
Pune Nashik Highway Accident : आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
आयशरने मागून धडक दिली, मॅक्स ऑटो हवेत उडून एसटीवर आदळली, पुणे-नाशिक महामार्गावर 9 जणांचा करुण अंत
Sanju Samson : संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
संजू सॅमसनवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार! याचे परिणाम श्रेयस-ईशानलाही भोगावे लागले, बीसीसीआय 'त्या' निर्णयावर नाराज
Saif Ali Khan Attacked: 'हा' तो नव्हेच...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरूच
'हा' तो नव्हे...; ताब्यात घेतलेला आरोपी, सैफला चाकू भोसकणारा नाही; पोलिसांची अधिकृत माहिती, तपास सुरू
Cidco : सिडकोला नवीन अध्यक्ष मिळणार, मंत्री संजय शिरसाट यांचा कार्यभार संपुष्टात,आमदारांचं लॉबिंग सुरु
संजय शिरसाट सिडकोचा यांचा कार्यभार संपुष्टात, कारण समोर;अध्यक्षपदासाठी आमदारांचं लॉबिंग सुरु
Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Onion : बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
बांगलादेशकडून कांदा आयातीवर 10 टक्के शुल्क लागू, कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत!
Embed widget