एक्स्प्लोर

Dada Bhuse : दादा भुसेंचे उदघाटन सुरु असताना '50 खोके एकदम ओके' च्या घोषणा, शेतकऱ्यांनी दाखविले काळे झेंडे

Dada Bhuse : धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दौऱ्यावर असलेले मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत रोष व्यक्त केला आहे.

Dada Bhuse : धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री तालुक्यात दौऱ्यावर असलेले मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवत रोष व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. 

बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे आज धुळे दौऱ्यावर होते. यावेळी साक्री तालुक्यातील कासारे येथे विविध कामांच्या भूमिपूजनासाठी जात असताना उपस्थित शेतकऱ्यांनी मंत्री दादा भुसे यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी (Farmers Protest) घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे यावेळी मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, शेतकऱ्यांनी मंत्री भुसेंना डावलत कांदा प्रश्नांकडे (Onion Issue) गांभीर्याने बघण्याचे सुचविले. 

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या कासारे गावात विविध विकास कामांच्या उदघाटनाच्या निमित्ताने बंदरे व खणीकर्म मंत्री दादा भुसे यांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले.  यावेळी कासारे गावात भुसे आल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवत रोष व्यक्त केला. कांद्याला भाव मिळत नाही, साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी हे आक्रमक आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी '50 खोके, मंत्री ओके' अशा जोरदार घोषणाही दिल्या. यावेळी उपस्थित पोलिसांनी आंदोलकांना बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला.मात्र शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत दादा भुसे यांना दखल घेण्यास भाग पाडले. 

दरम्यान शेतकऱ्यांचा रोषाला सामोरे गेलेले दादा भुसे यांनी गाडी थांबवत शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री भुसे यांनी शेतकऱ्यांची समजूत घालून त्यांचं म्हणणं ऐकण्याचा प्रयत्न केला... मात्र आक्रमक आंदोलक काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. शेतकरी अडचणीत सापडलेला आहे, मात्र त्यांना मदत होताना दिसत नाही असा आरोप आंदोलकानी केला. शिवाय मंत्री दादा भुसे त्यांच्यासमोरच शेतकऱ्यांनी ५० खोके मंत्री ओके अशा जोर जोरात घोषणा यावेळी शेतकर्‍यांनी देत दादा भुसे याचा निषेध केला.

50 खोके एकदम ओके 
सध्या राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेती पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अशातच नव्याने स्थापन झालेल्या शिंदे सरकारच्या मंत्री मंडळातील पूर्वीचे कृषिमंत्री सध्या बंदरे व खनिकर्म म्हणून काम पाहत असलेले दादा भुसे याना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत दादा भुसे यांना घेराव घातला. ५० खोके एकदम ओके अशा जोरदार घोषणाही यावेळी शेतकऱ्यानी दिल्या. 

कृषिमंत्री बांधावर 
एकीकडे राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत असून एक दिवस बळीराजासाठी अशी मोहीम राबविण्यात येत आहे. असे असताना सद्यस्थितीत नाशिकसह धुळे नंदुरबार जिल्ह्यात एकही भागात अतिवृष्टी झाल्याने शेकतकऱ्यांची पिके खराब झाली आहेत. अशावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने साक्री धुळे दौरा करावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Gadchiroli Voting Update : गडचिरोली जिल्ह्यातली मतदान प्रक्रिया दुपारी 3 वाजता थांबलीHemant Godse : Chhagan Bhujbal यांची लोकसभा निवडणुकीतू माघार, हेमंत गोडसे म्हणतात...Nagpur Voting: नागपुरात काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादाची घटना, जरीपटका आणि नारा भागातील घटनाSanjay Shirsath On Nashik Loksabha : नाशिकच्या जागेचा तिढा नव्हताच, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
Do Aur Do Pyaar Review:  वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?
वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
Embed widget