Buldhana Crime : तुझा मस्साजोगचा सरपंच करू, अवैध धंदे बंद केले म्हणून गावगुंडांचा सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला, आरोपी मोकाट; बुलढाण्यातील प्रकार
Buldhana Crime : तुझा मस्साजोगचा सरपंच करू, अवैध धंदे बंद केले म्हणून गावगुंडांचा सरपंच पतीवर प्राणघातक हल्ला
Buldhana Crime : बुलढाणा जिल्ह्यातील (Buldhana Crime) मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर या गावात अवैध धंदे बंद केल्याने चवताळलेल्या गावगुंडांनी सरपंच पतीवर प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला एका अंत्यसंस्काराच्या ठिकाणी करण्यात आला. सुभाष खुरद असं हल्ला करण्यात आलेल्या सरपंच पतीचं नाव असून त्यांच्यावर गावगुंडांनी प्राणघातक हल्ला केलाय. या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अधिकची माहिती अशी की, कळंबेश्वर येथील सुभाष खुरद यांच्या पत्नी डिसेंबर 2023 पासून ग्रामपंचायत सरपंच आहेत. आणि त्या सरपंच पदावर आल्यापासून त्यांनी गावात विविध विकास कामे सुरू केलीत. कामे सुरू करत असताना त्यांनी गावातील अवैध धंदेही बंद केले. त्यामुळे गावातीलच अवैध धंदे असलेल्या गुंडांनी त्यांच्या पतीला म्हणजेच सुभाष खुरद यांना अनेकदा धमक्याही दिल्या. काल गावातील एका वृद्ध महिलेच्या अंतिम संस्काराच्या आटोपून घरी परत जात असताना गावातील पाच गुंडांनी सुभाष खुरद यांच्यावर प्राण घातक हल्ला चढवत..."आमचे अवैध धंदे पुन्हा सुरू न करू दिल्यास आम्ही तुझा मस्साजोगचा सरपंच करू...!" अशी धमकी देऊन निघून गेले. या हल्ल्यात सुभाष खुर्द हे जखमी झाले असून त्यांच्या जवळील काही दागिने हल्लेखोरांनी लंपास केले. याप्रकरणी जानेफळ पोलिसांनी पाच आरोपींवर कलम 309 (2) ,115(2),351(2),351(3).352, 3(5) BNS नुसार गुन्हे दाखल केले असून अद्यापही आरोपी फरार आहेत.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूरमध्ये दुहेरी हत्याकांड ..
नागपूरमध्ये पोटच्या मुलाने आई व वडिलाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. कपिल नगर पोलीस ठाण्यांतर्गत खसाळा कॅम्पसमध्ये ही घटना पुढे आली..लीलाधर डाखोडे आणि अरुणा डाखोडे अशी मृतांची नावे असून आरोपी हा त्याचाच मुलगा उत्कर्ष डाखोडे आहे. मृतक लीलाधर हे कोराडी थर्मल प्लांटमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करतात तर अरुणा विनोबा भावे नगर येथील एका खाजगी शाळेत प्राथमिक शिक्षिका होत्या. आरोपी उत्कर्ष हा 6 वर्षांपासून अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. वारंवार अपयश आल्याने उत्कर्षच्या पालकांनी अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते. पण उत्कर्ष अभियांत्रिकी पूर्ण करण्याच्या त्याच्या आग्रहावर ठाम होता. मात्र आरोपी उत्कर्षला एमडीचे व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याला अभ्यास करता येत नव्हता. आई-वडिलांच्या सततच्या समजुतीमुळे तो चिडला आणि रागाच्या भरात त्याने आपल्या आई-वडिलांची हत्या करण्याचा घातक प्लॅन तयार केला. उत्कर्षने फ्लॅन नुसार 26 डिसेंबरला सकाळी त धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले होते. सेजल बीएमएसचे शिक्षण घेत होती आणि ती वर्धा रोडवर असलेल्या कॉलेजमध्ये जाते. उत्कर्ष ने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खासाळ येथील आपल्या घरी पोहोचला, तिथे 1 वाजण्याच्या सुमारास त्याने आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपी वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला. 5 वाजण्याच्या सुमारास वडील त्यांच्या ड्युटीवरून घरी पोहोचल्या नंतर वडिलांवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या