एक्स्प्लोर

Beed Police : वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 नवीन पलंग मागवण्यात आल्याची चर्चा, प्रशासनाचं स्पष्टीकरण; रोहित पवारांचाही निशाणा

Beed Police : बीड पोलीस ठाण्यात मागवण्यात आलेल्या 5 नवीन पलंगांबाबत पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

Beed Police  : बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Sarpanch Santosh Deshmukh)  यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड मंगळवारी (दि.31) पुण्यातील सीआयडी ऑफिसमध्ये शरण आला. त्यानंतर रात्री उशीरापर्यंत न्यायालयात सुनावणी पार पडली. या सुनावणीनंतर केज न्यायालयाने वाल्मिक कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर वाल्मिक कराडची (Walmik Karad) रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. दरम्यान, वाल्मिक कराड असलेल्या पोलीस ठाण्यात 5 पलंग मागवण्यात आल्याची चर्चा सुरु झाली होती. त्याबद्दल पोलीस प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून हे पलंग आम्ही स्वत:साठी मागवले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, आता यावरुन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे (NCP Sharad Pawar) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी काही सवाल उपस्थित केले आहेत. 

पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा; रोहित पवारांचा उपहासात्मक टोला 

रोहित पवार म्हणाले, बीड पोलीस स्टेशनमध्ये नवीन पाच पलंग मागवल्याच्या बातम्या आहेत, स्टाफसाठी नवीन पलंग मागवल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले असले तरी आजच अचानक पलंग कसे मागवले? असे अनेक प्रश्न आहेत.नवीन पलंग स्टाफसाठी मागवले असतील तर एवढीच तत्परता राज्यभरातील सर्वच पोलीस स्टेशनमधील स्टाफसाठी दाखवायला हवी शिवाय गादी-उशी, पंखा, AC देखील बसवता येतील का, याचाही विचार करायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 

संतोष देशमुख हत्येप्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन

बीड संतोष देशमुख हत्येप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.  बसवराज तेली पोलीस उपमहानिरीक्षक याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.  यामध्ये एकूण 10 अधिकारी तपास करणार आहेत.  त्यामुळे संतोष देशमुख यांच्या तपासला वेग येणार असल्याचे बोलले जात आहे. मस्साजोग, ता. केज, जि. बीड येथील सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपरोक्त संदर्भ येथील शासन निर्णयान्वये विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. सदर पथकात पोलीस अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्याची बाब शासन विचाराधीन होते. केज पोलीस ठाणे, बीड येथे विवध कलमान्वये  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी डॉ. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सी. आय. डी., पुणे यांच्या अध्यक्षतेखाली "विशेष तपास पथक (SIT)" स्थापन करण्यात आले आहे. याकरीता आवश्यक ते मनुष्यबळ शासनाच्या सहमतीने नियुक्त करण्याचे अधिकार विशेष तपास पथकाचे प्रमुख यांना दिलेले आहेत. त्याअनुषंगाने डॉ. श्री. बसवराज तेली (भा.पो.से.), पोलीस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा (EOW), सी. आय. डी., पुणे यांनी शासनाकडे मागणी केल्यानुसार सदर विशेष तपास पथकामध्ये खालील नमूद अधिकारी व अंमलदार यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Asha Pawar:पवार कुटुंबात बदल होणार,अजितदादांच्या मातोश्रींची छोटी सी आशा पूर्ण होणार?Milind Narvekar On X Post : फडणवीसांचे गुणगान,  मिलिंद नार्वेकरांच्या X पोस्टचा अर्थ काय?Naresh Mhaske : ठाकरेंचे मुंबईतील आमदार पक्ष सोडणार? नरेश म्हस्केंचं खळबळजनक वक्तव्यRaj Thackeray On Marathi Manus : मराठी हल्ला केल्यास मराठी म्हणून अंगावर येईन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
दोन भावांची भांडणं सोडवायला गेला, मध्यस्थी करणाऱ्या सचिनचाच खून झाला; आरोपीला पोलिसांनी उचचलं
Nitish Kumar : भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांचं वक्तव्य अन् नितीशकुमारांची शांतता, बिहारच्या राजकारणात नेमकं काय घडणार? राजदची भूमिका काय असणार?
नितीशकुमारांच्या शांततेतून राजकीय वादळाचे संकेत की आणखी काही? एनडीए सोडणं जदयूला सोपं आहे का?
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
पुढील अडीच वर्षात काय होईल ते आज सांगता येणार नाही; सत्काराच्या भाषणात अब्दुल सत्तांरांनी सगळंच काढलं
Shirdi News : नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
नववर्षात शिर्डी संस्थानचा मोठा निर्णय; सर्वसामान्य भाविकाला थेट आरतीचा मान, साई दरबारीही पंढरीचा पॅटर्न
Adani Group News: तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली 
तामिळानाडू सरकारकडून स्मार्ट मीटर प्रकल्पाचं टेंडर रद्द, अदानी ग्रुपच्या कंपनीनं लावलेली सर्वात कमी दरावर बोली
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
राजन साळवी शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार?; उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा, दोन दिवसांत निर्णय
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अभिनेता एजाज खानकडून दोघांना मारहाण, व्हिडिओ व्हायरल; 31 डिसेंबरच्या 2 घटना, पोलिसांकडून दखल
अमेरिका हादरली,नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांना चारचाकी वाहनानं चिरडलं अन् गोळीबार,12 जणांचा मृत्यू 30 जखमी, दहशतवादी हल्ल्याचा दावा
अमेरिकेत नववर्षाचा जल्लोष करणाऱ्यांवर कार चढवली, अंदाधुंद गोळीबार,12 जणांचा मृत्यू,दहशतवादी हल्ल्याचा दावा
Embed widget